म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन गुरूवारपासून सुरु होणार ; पालकमंत्री जयंतराव पाटील | ६ तालुक्यातील सर्व गावांना होणार लाभ

0
Rate Card
सांगली : म्हैसाळ योजनेचे सन २०२१-२२ चे उन्हाळी आवर्तन आज पासुन सुरू करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी दिले आहेत.
म्हैसाळ  उपसा सिंचन योजनेचे  एकूण लाभक्षेत्र ८१६९७ हे. असुन सांगली  जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव व जत या चार तालुक्यातील ७१६९७ हे. इतके तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला व मंगळवेढा या दोन तालुक्यातील १०००० हे. लाभक्षेत्र आहे.

या अगोदर ऑगस्ट – सप्टेंबर २०२१ मध्ये २.५० टीएमसी कृष्णा नदीच्या पुराचे पाणी उचलून योजनेच्या लाभ क्षेत्रातील तालुक्यातील सर्व तलाव भरून देण्यात आले होते. त्याचा
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.

सन २०२१-२२ चे उन्हाळी आवर्तन सुरु करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून
पाणी मागणी अर्ज जमा करण्याबाबत
वृत्तपत्रांमध्ये जानेवारी महिन्यात जाहीर प्रकटन देण्यात आले होते. तसेच गावोगावी अभियान राबविण्यात आले होते. यास अनुसरून सन २०२१-२२ उन्हाळी आवर्तन आज दिनांक ३ मार्च २०२२ पासून सुरू करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत
याचा लाभ क्षेत्रातील सर्व ६ तालुक्यातील गावांना होणार आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.