झेलन्स्की व पुतीन यांच्या हेकेखोरीमुळे जग विनाशाच्या वाटेवर

0

 

युक्रेन-रशिया युद्ध जास्त दिवस चालावे यापध्दीने अमेरिका डावपेच आखत आहे.तर रशिया हे युद्ध लवकरात लवकर संपवून युक्रेन काबीज करण्याच्या तयारीत आहे.अशा परिस्थितीत युद्ध जास्त दिवस चालत असेल तर रशियाकडून न्युक्लिअर अटॅक केव्हाही होवू शकतो.यामुळेच पुतीनच्या जिद्दीमुळे अणुबॉम्बचा धोका वाढला आहे.रशियाची युक्रेन काबीज करण्यासाठी लढाई ठीक होती.परंतु आता मांनवीय संकट आनखीच गडद झाल्याने संपूर्ण जगातुन रशियाची घोर निंदा होतांना दिसत आहे. रशिया-युक्रेन युध्दाला अमेरिका व नाटो  पुर्णपणे जबाबदार आहे यात दुमत नाही.परंतु आता संघर्ष कोठेतरी थांबायला हवा.झेलेन्स्कीने नाटो पासून दुर राहुन व जगातील संपूर्ण देशांशी संबंध ठेवुन आपले वर्चस्व कायम ठेवु शकला असता.

 

 

परंतु चालबाज अमेरिकेने झेलेन्स्कीच्या डोक्यात नाटोचे भुतं भरल्याने युक्रेन-रशिया संघर्षात तेल ओतण्याचे काम केले व युध्दातचा भडका उडाला.यामुळे युक्रेनमध्ये जिवीत व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. युक्रेन संघर्षासाठी झेलेन्स्की जास्त जबाबदार असल्याचे दिसून येते व स्वत:हुन युक्रेन नागरिकांना मृत्यूच्या खाईत लोटले आहे.आजच्या परिस्थितीत राजधानी कीव,सुमी शहर,खारकीव्ह,डोनेस्क शहरावर रशियाने मोठ्या प्रमाणात ताबडतोब घातक हल्ले करून तबाई केल्याचे दिसून येते.

 

युक्रेन नाटोमध्ये कोणत्याही परिस्थितीत सहभागी होवु देणार नाही असा संकल्प पुतिन यांनी घेतल्याने अणुयुध्दाची शक्यता जास्त वाढली आहे.याकरीता रशियाने युक्रेनमध्ये आपली संपूर्ण ताकद झोकुन आरपारच्या मुडमध्ये पुतिन दिसत आहे.रशियाला वाटले की युक्रेन सहज काबीज करता येईल.परंतु युक्रेनला युरोपियन संघ,नाटो व अमेरिका छुपी मदत करीत असल्याने 8 दिवस होवून सुध्दा रशिया संपूर्ण युक्रेन काबीज करू शकला नाही.याची चिंता व चीड पुतीनच्या डोक्यात घुमजाव करीत आहे.त्यामुळे युक्रेन -रशिया युद्ध ताबडतोब थांबले नाही तर जगाचा विनाश अटळ आहे.कारण रशिया क्लस्टर बॉम्ब,व्ह्याकुम बॉम्ब,मीसाईल, फायटर जेट व विनिशकारी हतीयार सारख्या घातक शस्त्राचा वापर करीत आहे.यापुढे जाणुन हायड्रोजन बॉम्ब किंवा परमाणु बॉम्बचा सुध्दा वापर करू शकते याला नाकारता येत नाही.कारण रशिया बलाढ्य देश आहे व आता त्याने माघार घेणे म्हणजे नामुष्की होईल असे पुतिनला वाटत आहे.

 

 

परंतु पुतिनच्या या कारवाईला जग हिटलरची उपमा देताना दिसत आहे.आजच्या परिस्थितीत सरकारच्या माध्यमांतून जी युक्रेनची मानवीय हानी सांगण्यात येत आहे त्याच्या हजार पटीने मानवीय हाणी झाली आहे व होत आहे.वित्तीय हाणी झालीच यात दुमत नाही.परंतु या युध्दात शाळा, कॉलेज, दवाखाने, लोकवस्ती,आबाल-वृध्द  व अनेक परिवार यांना सुध्दा रशियाने आपल्या निशाण्यावर घेतल्याचे स्पष्ट दिसुन येते.त्यामुळे युक्रेन-रशिया युद्ध नसुन नरसंहार होत असल्याचे मला वाटते.जगात युक्रेन सुंदरतेचे प्रतीक मानल्या जाते व रशिया -युक्रेन त्यांचे आपसात पारीवारीक संबंध सुध्दा आहेत.परंतु गेल्या आठ दिवसांत युक्रेन खंडरबनुन रक्तबंबाळ झाला आहे आणि लाशांचा अंबार लागलेला दिसुन येतो.

 

ही बाब मानवजातीसाठी अत्यंत चिंताजनक अंगावर शहारे येणारी आहे. रशियाला वाटत होते की युक्रेनला सहज काबीज केले जाईल.परंतु आज  8  दिवस होवून गेले.परंतु अजून पर्यंत युक्रेन काबीज करण्यास रशिया निशफळ होत असताना दिसत आहे यामुळे रशियाची चिंता वाढली आहे.रशियावर  युरोपियन संघटनेकडुन अनेक प्रतीबंध लावण्यात आले,खेळ संस्थांनानी सुध्दा अनेक प्रतीबंध लावले, त्याचप्रमाणे अनेक संस्थानांनी व देशांनी आर्थिक प्रतिबंध लावले,यु.एन.जी.ए.च्या 35 देशांनी रशियाची निंदा केली आहे 5 देशांनी रशियाचे समर्थन केले आहे.भारतीय विद्यार्थांच्या दृष्टीकोनातून यु.एन मध्ये भारताने रशियाला युद्ध ताबडतोब थांबविण्याची अपील केली आहे.अशाप्रकारे रशियावर दबाव येवुन सुध्दा तो युध्दाच्या बाबतीत तटस्थ आहे.अनेक देशांनी रशियावर लावलेल्या आर्थिक प्रतिबंधामुळे 110 करोड डॉलर चे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे पुतिन तितमिला होवुन अनुबॉम्बचा वापर केव्हाही करू शकतो याला नाकारता येत नाही.

 

अमेरिकेने आपला विस्तार वाढवीण्यासाठी व स्वार्थासाठी अनेक देशांचा व निरअपराध्यांचा बळी घेतला आहे.अफगानिस्तानमधील नरसंहार आणि तालीबान्यांची सरकार स्थापन करण्यात अमेरिकेचा मोठा वाटा आहे ही बाब संपूर्ण जगाने उघड्या डोळ्यांनी पहाली आहे.त्याचप्रमाणे अमेरिका तायवानला सुध्दा धोका देवु शकतो याला नाकारता येत नाही.युक्रेन नाटोमध्ये सहभागी व्हावा या उद्देशाने अमेरिकेने आपली संपूर्ण ताकद लावली.यामुळेच युक्रेन व रशियामध्ये युध्द टोकाला पोहोचल्याचे दिसून येते.युक्रेन-रशियातील ज्या काही घडामोडी सुरू आहेत.त्याला पुर्णपणे जबाबदार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनच आहे.अमेरिका सुपर पॉवरच्या नावाखाली जगातील छोट्या-छोट्या देशात संघर्षमय वावरण निर्माण करून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असुन आपली आर्थिक बाजू बळकट करीत आहे.कारण जो बायडनने अफगाणिस्ताननातुन सैन्य वापसी करून नरसंहार घडवीला व निरअपराध्यांचा बळी घेतला.

 

तेव्हा अमेरिका,युरोपियन संघ व युएन का धावुन आले नाही?परंतु आज रशियाने युक्रेनवर चढाई केल्याने अमेरिका, युरोपियन संघ,नाटो युक्रेनच्या पाठीशी उभे आहे मग हा अफगाण जनतेशी भेदभाव नाही का?अनेक आतंकवादी संघटनांना खतपाणी घालण्याचे काम आतापर्यंत अमेरिका करित आलेला आहे.त्याच अनुषंगाने अमेरिकेचा युक्रेननवर डोळा असल्याचे दिसून येते.सोवियेत संघातील 17 राज्य रशिया पासून वेगळे करून स्वतंत्र देश घोषित केले व यातील काही देश नाटोमध्ये सहभागी झाले आहेत.रशिया गेले अनेक वर्षांपासून  आपली स्वतःची पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे व त्यांनी आपली पकड मजबूत सुध्दा केली आहे.त्यामुळे आता रशियाचे एकच उद्देश आहे ते म्हणजे सोव्हिएत संघातील देशांना रशियामध्ये सहभागी करून घेणे.यासाठी रशिया आरपारची लढाई करण्यास तयार आहे ही बाब युक्रेन युध्दावरून दिसून येते.त्याचबरोबर रशियाचे 3700 जासुस युक्रेनमध्ये पहीलेपासुनच तयार आहेत.

Rate Card

 

कारण युक्रेन जर नाटोमध्ये सहभागी झाला तर रशियाची चिंता वाढणार यामुळे रशियाने संपूर्ण ताकदीनिशी युक्रेननवर आक्रमक चढाई केली.परंतु त्याला अजुन पर्यंत विजय प्राप्त झाली नाही.यावरून सिध्द होते की अमेरिका व नाटोने युक्रेनला छुपी मदत करीत आहे.युरोपीयन देशांना 50 टक्के गॅस पुरवठा रशियातुन होतो.त्यामुळे युरोपियन देशांची सुध्दा चिंता वाढली आहे.अमेरिकेने रशियावर कीतीही आर्थिक प्रतिबंध लावले किंवा लावण्याचा प्रयत्न केला तरीही रशिया युक्रेनच्या बाबतीत यत्किंचितही थांबणार नाही हे सुद्धा तीतकेच सत्य आहे.भारताचा पहिला मित्र रशिया नंतर अमेरिका हिबाब अमेरिका व नाटो देशांनी लक्षात ठेवली पाहिजे.

 

रशियाने युक्रेनला हस्तगत करण्यासाठी लुहान्स्क आणि डोनेत्स्क यांना स्वतंत्र देश घोषित करून अमेरिकेला जोरदार धक्का दिला आहे.कारण पुतिनच्या सध्याच्या चालीवरून असे दिसून येते की 1991 ला सोव्हिएत संघ कोसळुन धाराशाही झाला आणि प्रत्येक राज्य स्वतंत्र देशाची मागणी करू लागले व अनेकांचे स्वतंत्र अस्तीत्वात आले.या अनुषंगाने सोव्हिएत संघाच्या जोखडातून मुक्त झालेल्या देशांना खेचण्यासाठी अमेरिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या नाटो संघटनेची धडपड सुरू झाली आणि 2004 पर्यंत ईस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुआनिया या बाल्टिक देशांना नाटोने आपल्याकडे ओढले देखील.2008 मध्ये नाटोची नजर युक्रेनवर पडली व त्यापध्दतीने अमेरिका व नाटोने हालचाली सुरू केल्या.युक्रेनने सुध्दा नाटोमध्ये सामील होण्याची तयारी दर्शवल्याने पुतिनच्या तळपायाची आग मस्तकात गेली व आक्रमक पवीत्रा घेऊन युक्रेन सोबत युद्ध छेडले व अमेरिका-नाटोला टक्कर देण्याच्या संकल्प केला.

 

रशियाची आक्रमकता पहाता जगावर तीसऱ्या महायुद्धाचे बादल मंडरावीतांना दिसत आहे.कारण रशियाने बेलारूस वरून युक्रेनवर मोठ्या प्रमाणात युद्ध छेडल्याने रशिया हळूहळू युक्रेनची राजधानी कीवकडे चढाई करतांना दिसत आहे.किवमध्ये युक्रेनच्या मिलिटरी बेसवर हल्ला करून मोठे नुकसान पोहोचवीले आहे.युक्रेन-रशिया युध्दाला व रक्तपाताला स्वतः जो बायडनच जबाबदार असल्याचे मी समजतो.त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिनच्या कामाची प्रशंसा करत पुतिनला अफलातून (जीनियस) बुध्दीमान व्यक्ती अशी उपमा देऊन जो बायडन यांना करारा तमाचा दिला.कोणतेही युद्ध असो ते नुकसानदायकच असते त्यामुळे युक्रेन-रशिया युध्दात भारताने मध्यस्थी करून ताबडतोब युध्द थांबवून निरअपराध्यांना वाचविले पाहिजे व रक्तपात थांबवीला पाहिजे.कारण युद्ध हे मानवतेसाठी, जीवसृष्टीसाठी व पृथ्वीतलासाठी  घातक व विनाशकारी आहे.त्यामुळे भारत सरकारने चर्चेतुन ताबडतोब तोडगा काढावा अशी मी सरकारला विनंती करतो.

 

सुमी शहर,डोनेस्क,खारकीव्ह व राजधानी कीव्हसह 10 शहराची स्थिती अत्यंत बीकट व गंभीर आहे.युक्रेनमध्ये 20 हजारहून अधिक भारतीय नागरिक रहातात.भारत सरकारचे युक्रेन मधुन नागरिकांना काढण्याचे काम ऑपरेशन गंगा अंतर्गत युध्दपातळीवर सुरू आहे यात कोणीही राजकारण करू नये. परंतु सरकार व राजकीय पक्षांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे की भारतीय विद्यार्थी विदेशात शिकायला का जातात? भारतातील शिक्षण कमजोर तर नाही? कारण भारतातील अनेक शाळा -महाविद्दालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत याचे कारण काय?यावर मंथन करने गरजेचे आहे.भारतातील मेडिकल फिल्डचे विद्यार्थी जास्तीत जास्त युक्रेनला किंवा रशियात जातात असे का?याचा गहन अभ्यास करण्याची वेळ भारत सरकारवर आली आहे.                                     

 

रमेश कृष्णराव लांजेवार                                (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779, नागपूर.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.