उच्‍च माध्‍यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू  

0

सांगली : सांगली जिल्‍ह्यामध्‍ये उच्‍च माध्‍यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च / एप्रिल 2022 दि. 4 मार्च  ते 30 मार्च 2022 अखेर जिल्ह्यातील एकूण 50 परिक्षा केंद्राच्‍या ठिकाणी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. परिक्षा केंद्राच्‍या ठिकाणी कॉपी करण्‍यास, झेरॉक्‍स काढण्यास आळा बसणे व शांतता आणि सुव्‍यवस्‍था राखली जावी यासाठी जिल्‍हादंडाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी परीक्षा केंद्रावर इमारतीपासून 100 मिटरच्या सभोवतालच्या परिसरात दि. 4 मार्च ते 30 मार्च 2022 कालावधीसाठी सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून खालील कृत्‍यांना मनाई केली आहे.

परीक्षा वेळेत दोन किंवा त्‍यापेक्षा जास्‍त लोकांनी फिरण्यास,  एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. वरील नमुद वेळेत परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्‍स मशिन, टेलिफोन, बुथ, फॅक्‍स मशीन, ध्‍वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्‍याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.

Rate Card

हा आदेश कायदेशीर कर्तव्‍य बजावीत आलेल्‍या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्‍हादंडाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.