तासगावच्या विद्यार्थ्याची जतेत आत्महत्या

0
जत,संकेत टाइम्स : तासगाव तालुक्यातील सावळज येथील शंकर शामा पवार (वय १९)या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने जत येथे गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी व्हाट्स अपच्या स्टेटसला त्याने सर्व मित्राची क्षमा मागून माझ्या आत्महत्येला कोणास जबाबदार धरू नये असा उल्लेख केला आहे.

 

मयत शंकर पवार हा तासगाव तालुक्यातील सावळज येथील असून तो इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे.  गुरुवारी तो जत येथे आपल्या बहिणीकडे आला होता.गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर त्याने आपल्या स्टेटस वर मिस यु मित्रांनो, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही असा संदेश अपलोड केला होता. यामुळे सर्व नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतु शंकर आढळून आला नाही.
त्यामुळे संबंधितांने पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती परंतु शुक्रवारी सकाळी विठ्ठलनगर जवळ असणाऱ्या पानमळा येथे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.