मुंचडी सोसायटीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेशराव पाटील यांच्या पँनेलचा मोठा विजय

0
जत,संकेत टाइम्स : मुंचडी येथील सर्वोदय विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेशराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री. शंकरलिंग शेतकरी विकास पँनेलने घवघवीत यश संपादन केले असून १३ पैंकी १३ जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळविली आहे.विरोधी कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षाच्या पँनेलचा पराभव झाला आहे.

 

 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू असलेले रमेशराव पाटील यांनी यावेळी मोठा विजय मिळविला आहे.येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी या विजयाचा मोठा परिणाम दिसणार आहे.रमेशराव पाटील यांचे नेतृत्व पुन्हा मान्य करत सभासदानी विश्वास दाखविला आहे.

 

 

विजयी उमेदवार असे,यशवंत मच्छिद्र काटे,रमेश शिवराया उमदी,रायगोंडा बसगोंडा पाटील,रावसाहेब शंकर पोलीसी,संतोष निगाप्पा तेली,अशोक आप्पासाहेब सौंदत्ती,हाजीमंलग नबीसो पिंजार,दऱ्याप्पा सुबराया मलमे,शांताबाई सुरेश पाटील,कविता रविंद्र बिरादार,महेश शिवाजी जाधव,पुंडलिक दादू चांभार,शिवानंद तम्मण्णा हंजगी असे उमेदवार विजयी झाले आहेत.विजयानंतर गुलालची उधळण,फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
सभासदाचा विश्वास सार्थ ठरवू
सोसायटीच्या सभासदानी आमच्या पँनेलवर दाखवत दिलेला मोठा विजय सार्थकी लावू, यापुढे गावातील शेतकरी प्रत्येक शेतकरी समृद्ध झाला पाहिजे,कोणताही भेद न ठेवता सोसायटीच्या माध्यमातून हातभार लावेल.आमचे नेते जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील आदर्श सोसायटी निर्माण करू.
– रमेशराव पाटील
तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉग्रेस
मुंचडी सोसायटीच्या निवडणूकीत मोठा विजय मिळविल्यानंतर जल्लोष करण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.