बंदिस्त पाईपलाईन कामाची 220 कोटीची निविदा निघाली | आमदार विक्रमसिंह सांवत यांची माहिती ; तालुक्याचे मोठे लाभ क्षेत्र ओलिताखाली येणार

0

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील म्हैशाळ योजना कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामासाठी २२० कोटी ८१ लाखांचे निविदा प्रसिध्द झाली असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह  सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आमदार सांवत म्हणाले, जत तालुक्यातील अपूर्ण असणाऱ्या शेतीच्या पाण्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आहे.अनेक वेळा आम्ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब व सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे एवढा मोठा निधी जत तालुक्याला मिळाला आहे.तालुक्यातील जवळपास ६० ते ७० गावांच्या शेतीच्या पाण्याच्या योजना मार्गी लागणार असून मोठे लाभक्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार आहे.

 

 

आमदार सांवत म्हणाले, म्हैशाळ योजना कालव्यांचे बंदिस्त पाईपलाईनची अपूर्ण असणारे कामे अनेक वर्षापासून प्रलंबित होते.आम्ही निधी देण्याची मागणी सरकारकडे केली होती.आता २२० कोटी ८१ लाखाचा निधी उपलब्ध झाला असून त्यांची निविदाही निघाली आहे.तालुक्यातील जत कालवा कि.मी.१ ते २५ या कामासाठी २१ कोटी १७ लाख इतकी रक्कम, क्षेत्र ४८१५, जत कालवा कि.मी.२६ ते ५२ या कामासाठी  ३२ कोटी ३६ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ४९३६,जत कालवा कि.मी ५३ ते ८१ या कामासाठी १६ कोटी ७९ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ४३७६ ,जत शाखा कालवा या कामासाठी ३६ कोटी ८५ लाख इतकी रक्कम व क्षेत्र १०,५८३,देवनाळ १ ,२ या साठी ३० कोटी २७ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ७,५०६,देवनाळ विस्तारित २२ कोटी ३१ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ७,७०७,अंतराळ सिंगणहळळी बनाळी शेगाव यासाठी २० कोटी ७४ लाख इतकी रक्कम व क्षेत्र ५,१६० ,बिळूर १,२ यासाठी २१ कोटी १३ लाख व क्षेत्र ३,१७७ ,मिरवाड यासाठी १९ कोटी १५ लाख व क्षेत्र ३,७६९ अशा एकूण कामांसाठी २२० कोटी ८१ लाख इतका निधी व ५२,०२५ हेक्टर आर क्षेत्रावर कामे होणार आहेत.

 

Rate Card
आमदार सांवत म्हणाले, बंदिस्त नलीकेद्वारे लाभक्षेत्राची विकास कामे करण्यासाठी पाच वर्षे कालावधी आहे. देखभाल दुरुस्ती व यशस्वी परिचलन करणे या कामासाठी हा निधी प्राप्त झाला आहे.त्याची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच कामे हि निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुरु केली जातील या कामामुळे जत तालुक्यातील ६० ते ७० गावातील शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे.सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.यापुढे तालुक्यामध्ये विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ना.जयंत पाटील व मा.ना.विश्वजित कदम यांच्याकडून निधी आणून विकासाचा अनुषेश भरू काढू,असेही शेवटी आमदार सांवत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.