प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन  

0

 

 

        सांगली प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दुसऱ्या व ‍तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. यामध्ये प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, तंत्राव्दारे आरोग्य तपासणी, अतिजोखमीच्या मातांचे निदान, समुपदेशन व योग्य संस्थामध्ये संदर्भ सेवा यांचे योगदान हे या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेस  हे अभियान शासकिय संस्थामध्ये राबविण्यात येत आहे. सर्व गरोदर मातांनी दि. 9 मार्च 2022 रोजी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

 

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये दि. 9 मार्च  रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी पथकाद्वारे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सत्र भेट मोहिम आयोजित केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यामधील प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सत्रांची प्रभावीपणे अंमलबजावणी, अडीअडचणी व सत्राठिकाणी देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा व माहिती विषयक अभ्यासातून पुढील दृष्टीकोनातून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सत्रामार्फत प्रभावी व यशस्वी आरोग्य सेवा व माहिती ग्रामस्तरापर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

Rate Card

 

 

सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण कार्यक्षेत्रातील ३ हजार ५४४ गरोदर मातांकरिता दि. 9 मार्च रोजी एकूण ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सत्र आयोजीत केले आहे. यापैकी १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सत्रांच्या भेटीकरीता 19 जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यादरम्यान प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान पर्यवेक्षण चेकलिस्टचा वापर करून बावनिहाय सर्व वस्तुनिष्ठ पाहणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.