जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी

0
ऐतवडे खुर्द : जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी या वाक्यामध्ये स्त्री शक्ती किती आहे हे समजते पण आताच्या आधुनिक काळात जिच्या हाती उद्योगाची दोरी ती जगाला उद्धारी असे म्हटले तरी वा वगे ठरणार नसल्याचे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सोनाली नवांगुळ यांनी व्यक्त केले
     ऐतवडे खुर्द तालुका वाळवा येथील बाजीराव बाळाजी पाटील सांस्कृतिक सभागृह मध्ये   आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी साजरा करण्यात आला सामाजिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी श्रीमती सोनाली नवांकुळे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी जयदत्त योग प्रबोधनी च्या संचालिका डॉक्टर सौ प्रज्ञा पाटील होत्या यावेळी श्रीमती नवांगुळे म्हणाल्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा सहभाग आहे एक महापुरुष आणि समाजातील अनेक महापुरुषांना घडविण्यास स्त्रियांचे काही प्रमाणात योगदान आहे महिला या देशाच्या भविष्य ठरविणारी शक्ती आहे ही शक्ती सक्षम बनवण्याची जबाबदारी समाजाची आहे आज स्त्री शक्ती मुळे स्त्रीमुक्ती चळवळीने चाळीस वर्ष वर्षाचा काळ घातला आहे विविध पातळ्यांवर आज ही संघर्ष आणि लढाई समाजात उभे राहिले आहेत या जाणिवेच्या पातळीवरून स्त्रीवाद हा सर्वत्र पोहोचला आहे एकोणिसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता त्यावेळेस स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आपल्या देशात राजाराम मोहनरॉय, महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे अशा विविध मान्यवरांनी आवाज उठवला. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ प्रज्ञा पाटील म्हणाल्या खरेच स्त्रियांशीवाय घर कुटुंब अपुरेच असते कुटुंबातील सर्वांसाठी घरभर वारा होऊन ती फिरत असते तरीही तिची हेळसांड होतेच आपल्या इच्छाआकांक्षांना त्यावर घालते मन मारून इतरांसाठी जगते समानतेची वागणूक तिला दिली जात नाही म्हणूनच कवी कुसुमाग्रज यांच्या शब्दात सांगायचे झाले तर समान मानव माना स्त्रिला तिची अस्मिता खुडू नका दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणूनी भोजू नका असेही मत डॉ. पाटील यांनी मत व्यक्त केले मातृशक्ती म्हणून मलाही माझ्या भोवती होत असलेल्या सामाजिक असंतुलनाला विडा उचला वाच लागेल या महिला मेळाव्यात वारणा महिला पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीमती छाया बर्गे शोभा पाटील शोभा धारवड सुनिता पाटील सविता सावर्डेकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या या मेळाव्याचे प्रास्ताविक सौ बी डी पाटील मॅडम व स्वागत सौ मनीषा संपकाळ यांनी केले तर  आभार प्रा सुवर्णा आवटे यांनी केले
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.