जत,संकेत टाइम्स : जत येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ३१ कोटी ४९ लाख रूपयाच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सांवत यांनी दिली.
जत येथे १०० वर्षापुर्वीचा इमारत आहे.सध्याची इमारत जूनी व अपुरी पडत आहे.दोन न्यायालये,सुमारे ७० वकील व कर्मचारी, अधिकारी यांना काम करताना मोठ्या अडचणीचे ठरत होते.
त्यामुळे न्यायालयाची सुसज्ज इमारत बांधण्याची मागणी करण्यात आली होती.तसा प्रस्ताव शासनाकडे दाखल झाला होता.
महायुतीचे सरकार आल्यापासून विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याची दखल घेत शासनाने जत येथील न्यायालयीन प्रशस्त इमारत बांधकामासाठी उच्च न्यायालयाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास ३१ कोटी ४९ लाख इतक्या अंदाजित खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्याचे लवकरचं टेंडर प्रक्रिया होऊन प्रशस्त इमारतीच्या कामास सुरूवात होणार असल्याचे आमदार सांवत यांनी सांगितले.
प्रशस्त व सुसज्ज इमारत होणारजत येथील न्यायालयाची इमारत १०० वर्षापुर्वीची असल्याने कामकाज करताना मोठ्या अडचणीचे ठरत होते.त्यामुळे प्रशस्त इमारत बांधावी,अशी मागणी आ.सांवत यांनी सातत्याने सरकारकडे केली होती.अखेर इमारतीच्या बांधकामासाठी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे आभार आ.सांवत यांनी मानले आहे
जत : न्यायालय इमारतीच्या निधी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.