दुहेरी खूनाच्या घटनेने जत तालुका हादरला

0

जत,संकेत टाइम्स : उमदी ता.जत येथे मोबाइल स्टेट्स ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत दोन तरूणाचा खून व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटनेने जत तालुका हादरला आहे. मंगळवारी मध्यरात्री झाली आहे.

संतोष माळी,मदगौडा बगली रा.उमदी असे खून झालेल्या तरूणाची नावे आहेत,तर प्रकाश परगौड असे जखमीचे नाव आहे.

 

घटनास्थळ व प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून उमदीतील तरूणाच्या दोन टोळक्यात स्टेट्स ठेवण्यावरून वाद सुरू होता.काही दिवसापुर्वी पुन्हा त्यांच्या वाद झाला,मंगळवारी रात्री त्याला गंभीर स्वरूप आले,

Rate Card

 

 

दोन्ही बाजूनी धारदार शस्ञाने हल्ला झाल्याने दोघाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उमदीचे सा.पो.नि.पंकज पवार हे पथकासह घटनास्थळी पोहचले असून काही संशयिताची धरपकड सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.