उमदी दुहेरी खून प्रकरण ; २४ तासाच्या आत ९ संशयितांना पकडले

0
5
उमदी,संंकत टाइम्स : उमदी ता.जत येथे किरकोळ वादाचा राग मनात धरून नऊ दहा जणांच्या टोळीने तलवार,चाकू,काठीने गंभीर मारहाण करून दोघा तरुणांचा निर्घृण खून केल्याची तर एकजण गंंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.त्याला उपचारासाठी सोलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

याप्रकरणी उमदी,जत पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून संशयित ९ जणांना ताब्यात घेतले आहे.गुंडु ऊर्फ मदगोंडा नागाप्पा बगली (वय-२१), संतोष राजकुमार माळी (२१) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर, प्रकाश महादेव परगोंड (२१) गंभीर जखमी आहे.ही घटना मंगळवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास गावापासून २ कि मी अंतरावर अहमदनगर विजापूर महामार्गावर पादगट्टी ठिकाणी घडली आहे.

 

याप्रकरणी हर्षवर्धन अनिल देशमुख,(वय २० वर्षे, रा. पडसाळी, ता. माढा, जि. सोलापूर), संदीप तुकाराम भोसले,(वय १९ वर्षे, रा. उमदी,ता.जत),अक्षय रामचंद्र भिसे, (वय २० वर्षे, रा. उमदी, ता. जत),संजय ऊर्फ मल्लिकार्जुन शामराव शिंदे,(वय ३१ वर्षे, रा. उमदी, ता. जत),इंद्रजीत यशवंत वाघ, (वय १९ वर्षे, रा.उमदी, ता. जत),विकास मनोहर भिसे, (वय १९ वर्षे, रा. उमदी, ता. जत),विकास बिराप्पा गुळदगड,(वय २४ वर्षे, रा. कुलाळवाडी, ता. जत),तेजस्वीकुमार ऊर्फ यलाप्पा गुंडाप्पा साळुखे ऊर्फ भाट, (वय ३२ वर्षे, रा. उमदी, ता. जत),मारूती सोमलिंग माळी,(वय १९ वर्षे, रा. उमदी, ता. जत )यांना ताब्यात घेतले आहे.

 

घटनास्थळी पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम,डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सुचना दिल्या होत्या.सा.पो.नि.पंकज पवार यांच्या पथकाकडून रात्री घटनेचा पंचनामा करण्यात आला.
उमदी हे पूर्व भागातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील संवेदनशील असे गाव आहे. मयत गुंडा बगली, संतोष माळी, प्रकाश परगोंड हे मित्र आहेत. ते काल, मंगळवारी रात्री धाब्यावर जेवायला गेले होते.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उभारलेल्या स्टेजवर चढण्या उतरण्यावरून झालेलेल्या किरकोळ वादाचा दोन गटात अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता.यावरुन बाचाबाची झाली. घटने अगोदर एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली होती.

 

मंगळवारी रात्री मयत मदगोंडा बगली,संतोष माळी व जखमी प्रकाश परगौंडा हे जेवण करुन येताना संशयित आठ-दहा जणांनी हल्ला केला.काठी, धारधार शस्त्र, दगडाचा वापर झाला. यामध्ये गुंडा ऊर्फ मदगोंड बगली, संतोष माळी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात दोघांना सोलापूरला उपचारासाठी नेहत असताना मृत्यू झाला.तर प्रकाश परगोंड हा गंभीर जखमी झाला.

 

 

माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेहाचे जत येथे पोस्टमार्टेम करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.

पोलीस व नातेवाईकांनी जखमी प्रकाश महादेव परगोंड याला सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तरुणाला दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत

दरम्यान घटनेचे गांर्भिर्य ओळखून पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सुचना दिल्या होत्या.त्यानुसार आरोपीच्या शोधासाठी डिवायएसपी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जतचे पो.नि.राजेश रामाघरे,सा.पो.नि.पंकज पवार यांची पथके रवाना केली होती.पथकांने घटनेतील ९ संशयितांना २४ तासाच्या आत पकडले आहे.अन्य संशयितांचाही शोध सुरू आहे.
२४ तासात संशयित ताब्यात
घटना घडल्यापासून तपासाची चक्रे गतीने फिरवत डिवायएसपी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळावरून संशयितांना पकडण्यासाठी पथके रवाना केली होती.अगदी नेमका तपास करत जतचे पो.नि.राजेश रामाघरे,उमदीचे सा.पो.नि.पंकज पवार उपनिरिक्षक संजय भारती,शिरिष शिंदे,लक्ष्मण खरात,व जत,उमदी ठाण्याचे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी २४ तासाच्या आत संशयितांच्या मुशक्या आवळत ९ जणांना ताब्यात घेतले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here