लोहगाव रखडलेल्या नळपाणी पुरवठा योजनेची चौकशी करा ; विश्वंभर बोरगे
आंवढी,संकेत टाइम्स : लोहगाव ता.जत येथील गेल्या १० व र्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी विश्वंभर सिताराम बोरगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गाव व वाड्या वस्त्यासाठी 2012 साली पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे.अंदाजे 1 कोटी 75 लाख निधीची ही योजना दहा वर्षे झाली तरी पुर्ण झालेली नाही. केलेली कामे निकृष्ट व अर्धवट आहेत.त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी बोरगे यांनी केली आहे.
