कमल अर्थोपेडिक सेंटरचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर : डॉ.कैलास सनमडीकर

0
जत, संकेत टाइम्स : जत येथील उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या कमल आर्थोपेडिक सेंटर यार रुग्णालयाचे मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात रूपांतर करण्यात आले असून, मेडिसिन विभागाचे उद्घाटन श्रीमती कमल सनमडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

जत येथील कमल आर्थोपेडिक सेंटरमध्ये यापूर्वीच आर्थोपेडिक विभाग व रेडिओलॉजिस्ट हे दोन विभाग अगोदरच सुरू होते. बुधवारी मेडिसिन विभागाचे काम सुरू करण्यात आले. रायचूर येथील डॉ. के. प्रसाद यांनी एमडी मेडिसिन म्हणून रुग्णालयात कार्यभार स्वीकारला आहे. डॉक्टर के. प्रसाद यांनीआठ वर्षे काम केले आहे. मेडीसीन विभागात आय.सी.यु. (अतिदक्षता विभाग), जनरल वॉर्ड, इलेक्ट्रो कार्डीओग्राम, दमा व क्षयरोग उपचार, हृदयविकार निदान व उपचार, मधुमेह निदान व उपचार, किडनीचे आजार, श्वसनाचे गंभीर आजार, हृदयाचे झडपांचे आजार, हृदयाचे अनियमित ठोके, तीव्र व कमी रक्तदाब, रक्त पेशीचे आजार, सर्पदंश व विषबाधा उपचार, मेंदुचे विकार
अर्धांगवायु, गंभीर स्वरुपाचे कावीळ, थॉयराईड ग्रंथीचे आजार व इन्फुजन पंप आदी सुविधा 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे.

 

पंतप्रधान, महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत अशा तीन योजना मेडिसिन व अर्थोपेडिक विभागात सुरू असून अतिदक्षता विभागातील काही आजारावर येथे मोफत उपचार केले जाणार आहेत. हे रुग्णालय धर्मादाय हॉस्पिटल म्हणून मान्यताप्राप्त असून उपलब्ध निधी नुसार पुढे चांगल्या वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे.

 

एकाच छताखाली सर्व सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे डॉ. कैलास सनमडीकर यांनी सांगितले. सध्या अद्यावत असे 50 बेडचे हॉस्पिटल असून पुढे सुपर स्पेशालिटी विभाग सुद्धा भविष्यात सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. सनमडीकर यांनी सांगितले.डॉक्टर हरीश माने, डॉक्टर रवी जानकर, विशाल जाधव, मेंडगर सर  व सर्व स्टाफ उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.