ड्रोनद्वारे सर्व्हे केल्यामुळे गावातील मोजणी अचूक होईल : खासदार संजयकाका पाटील | ड्रोनद्वारे तालुक्यातील 39 गावांच्या सिटी सर्व्हेचा शुभारंभ

0
तासगाव : केंद्र सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील 39 गावांचा सिटी सर्व्हे ड्रोनद्वारे केल्यामुळे गावातील मोजणी अचूक होईल असे मत खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.
भारत सरकारच्या सर्व्हे ऑफ इंडिया या विभागा मार्फत ड्रोनसर्व्हेचा शुभारंभ तासगाव तालुक्यातील वासुंबे येथे करण्यात आला यावेळी तहसिलदार रविंद्र रांजणे, बी.डी.ओ.दीपा बापट, रिपाई लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेशभाऊ भंडारे, तालुका भूमी अभिलेख निबंधक वाय.सी.कांबळे, सरपंच छायाताई थोरात आदी प्रमुख उपस्थितीत होते.

 

सत्तर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेल्या सर्व्हे नंतर आता हा आधुनिक पद्धतीने सर्व्हे होत असून राज्यातील 40 हजार गावांचा गावठाण सिटी सर्व्हे ची मोजणी होत आहे, यामुळे नागरिकांना अचूक पद्धतीने प्रॉपर्टी कार्ड, मालमत्तेचे उतारे मिळतील, सांगली जिल्ह्यात हजारो लोकांना याचा फायदा होईल तासगाव तालुक्यातील 39 गावांचा सर्व्हे पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आला. यावेळी तालुका भूमी अभिलेख अधिकारी वाय.सी. कांबळे यांनी याबाबत सर्व माहिती सांगितली जलदगतीने मोजणी करून आधुनिक पद्धतीने हा सर्व्हे केल्यामुळे उताऱ्यावरील चुका होणार नाहीत,यासाठी काम केले जात आहे असे सांगितले.

 

यावेळी मोजणी विभागाचे कार्यालयीन प्रमुख सी.डी. शिराढोणे, मनीषा धोंडे, संदीप कीर्तिकर, माजी सरपंच बाळासाहेब एडके, तासहिरा फाऊंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे, मारुती (भाऊ) एडके (मा.उपाध्यक्ष, भाजपा तासगांव तालुका), अमोल खरमाटे, अशितोष सुतार, विराज यादव, प्रताप एडके, बाबासो चव्हाण, राजू लोखंडे ग्रामसेवक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.