जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील तिप्पेहळ्ळीत येथे अज्ञातांनी राजाराम तायप्पा ढोणे (वय ४६) यांच्यावर तलवारीने हल्ला करून जखमी घटना घडली.तालुक्यातील तिप्पेहळळी येथील राजाराम ढोणे हे गुरुवारी सायंकाळी त्यांचे एक नातेवाईक मृत झाल्याने पत्नीला आणण्यासाठी सांगोलाकडे दुचाकी वाहनावरून निघाले होते.
आवंढी फाट्याजवळ अज्ञात दोन हल्लेखोरांनी गाडी आडवी लावून ढोणे यांच्यावर तलवारीने वार करून पलायन केले. या हल्ल्यात ढोणे हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे.नेमके हल्ला कशामुळे झाला हे समजले नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.