लातूर,नागपूरमध्ये प्रेमीयुगुलांची आत्महत्या, हे होत कारण..

0
लातूर : महाराष्ट्रात पुन्हा दोन प्रेमयुगुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे.एक लातूर आणि एक नागपूरमधिल घटना आहे.

 

लातूर येथील प्रेमीयुगुलांनी अहमदपूर तालुक्यातील गुगदळ या गावच्या शिवारातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. तर, नागपूर येथील प्रेमीयुगुलांनी रेल्वेसमोर उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

लातूर शहरात वास्तव्यास असलेले वीस वर्षाच्या आतील तरुण-तरुणीनं अहमदपूर तालुक्यातील गुगदळ या गावच्या शिवारातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. पाच मार्चपासून हे दोघे घरून बेपत्ता होते. आत्महत्येचे नेमके कारण काय होतं हे अद्याप समोर आलं नाही. याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rate Card

नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील धक्कादायक घटना घडलीय. घरातून पळून गेलेल्या प्रेमीयुगुलांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केलीय. 18 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी हे दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. दोघे कामठी शहरात जय भीम चौक परिसरात राहत होते. आपल्या मैत्रीला घरच्यांचा विरोध आहे, हे लक्षात आल्यावर 8 तारखेला दोघांनीही कामठी शहरातील जय भीम चौक येथील राहत्या घरातून पळ काढला होता.काल रात्री दोघांनी अहमदाबाद एक्सप्रेस ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.