मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश

0
मुंबई : मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत या महिन्यात संपत आहे. तसेच या संस्थांच्या निवडणूका किमान 4 महिने तरी घेणे शक्य नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर 4 महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत संपताच जिल्हापरिषदेची सर्व सूत्रे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहेत. पंचायत समित्यांची सूत्रे गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली जाणार आहेत.
Rate Card
राज्यातील 27  जिल्हा परिषदांची व पंचायत समित्यांची मुदत मार्चअखेर संपणार आहे.निवडणूका घेण्यासाठी चार महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे पुढील किमान चार महिने प्रशासक येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.