धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी लिखित ‘धर्मपिता महात्मा बसवण्णा’ पुस्तकाचे प्रकाशन 

0
जत,संकेत टाइम्स : जत येथील शिवलिंगव्वा मठातील सभागृहात धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी यांच्या धर्मपिता महात्मा बसवण्णा पुस्तकाचे  प्रकाशन व समाज प्रबोधन या संयुक्त कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजन धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी परिवाराने केले होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना शरण तुकाराम माळी म्हणाले की,जत तालुक्यातील खोजनवाडी गावातील बसवभक्त आणि धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी, सुभाष सायंगाव,महादेव तेली, सदाशिव सिध्दरेड्डी,आय.जी.बिराजदार, बाबुगौड भालकी,बेळुकी गावचे अथणीकर सावकार,महादेव रामा माळी,मेजर महादेव माळी, पै.लक्ष्मण माळी आदी मान्यवर बसवधर्मपीठ कुडलसंगम यांचे प्ररणेतून बसव तत्व प्रचार व प्रसार करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात.

 

परंतु २९ फेब्रुवारी व १ मार्च २०२० रोजी अविनाश भोसिकर आयोजित लिंगायत समन्वय समितीच्या कार्यक्रमानंतर कोरोना साथ रोगाच्या मुळे सार्वजनिक कार्यक्रम थांबले.परंतु धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी यांचे लिंगायत धर्म प्रसाराचे काम वर्क फ्रॉम होम करून अविनाश भोसिकर यांचे लिंगायत महामोर्चे या मराठी पुस्तकाचे कन्नड मध्ये अनुवाद आणि प्रा.सिध्दाना लंगोटे यांच्या धर्मपिता विश्वगुरू महात्मा बसवण्णानावरु या कन्नड पुस्तकाचे धर्मपिता महात्मा बसवण्णा यापुस्तकाचे मराठीमध्ये अनुवाद केले आहे.
धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी हे आदर्श व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या बद्दल सर्वांना आदर आहे.शिक्षण संस्थेचे चेअरमन या सारख्या पदावर काम करीत असताना सुध्दा माझ्यापेक्षा कनिष्ठ कोणी नाही या बसवण्णांच्या तत्वानुसार वागतात.

 

Rate Card
पट्टणशेट्टी परिवारातील त्यांचे पुत्ने डॉ. शालीवहान पट्टणशेट्टी व त्यांच्या धर्मपत्नी डॉ सौ. सरीता पट्टणशेट्टी या बसवधर्म प्रसार प्रचार करणे साठी व्याख्याते म्हणून देशभर दौरे करतात. धानाप्पाण्णा यांच्या धर्मपत्नी शांतला यांचे लिंगैक्या झाल्यानंतर सुध्दा मुलगा संतोष व स्नुशा सीमाताई यांनी धानाप्पाण्णांना कशांचीही उन्नीव भासु दिली नाही. त्यामुळे धानाप्पाण्णांना कौटुंबिक स्वास्थ चांगले लाभले आहे.
जत तालुक्याचे सुपुत्र मिरजेचे तहसीलदार डी.व्ही. कुंभार म्हणाले की, धर्म हा मानवाच्या प्रगतीसाठी असून प्रत्येक धर्माच्या उपासनेच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत. धर्म उपासना करताना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन इष्टलिंग पूजा हे लिंगायत धर्मात तर विपषना बौद्ध धर्मात साधर्म्य असलेल्या उपसनेच्या पध्दती आहेत. लहान मुले व तरुण वर्ग यांना संस्कार देणे गरजेचे आहे.

 

 

सोलापूर पुण्यनगरीचे उपसंपादक चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी धानाप्पाण्णांना पट्टणशेट्टी यांनी आपल्या पुस्तकाची निर्मिती करताना माझ्याकडून चिकाटीने प्रस्तावना लिहून घेतली. बसवराज कन्नजे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,लिंगायतानी सर्वीबरोबर मिळून काम करावे.
कार्यक्रमास,जत पं.स.चे  माजी सभापती शरण आर.के.पाटील,

 

 

सांगली जि.प.च्या माजी सभापती शरणी सौ.सुजाता पाटील, प्रसिद्ध व्यापारी सिध्दाप्पांना शिरशाड,लेखिका सौ.शालीनी धोडमनी,राजशेखर तंबाखे,बाळासाहेब पाटील, भट्टकली, राजेंद्र कुंभार, प्रदिपबापू वाले,आप्पासाहेब शेगांवे,राजेंद्र माळी, राजु आरळी,रवींद्र सोलनकर, चंद्रकांत बंडगर, हाजीसाहेब हुजरे, संगाप्पा हिप्परगी आदी मान्यवर उपस्थित होते.आभार शरणी डॉ.सरीता पट्टणशेट्टी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.