जेसीबीखाली सापडून शाळकरी मुलगा ठार | इस्लामपूर रस्त्यावरील घटना

0
4
इस्लामपूर : सिमेंट रस्त्यांवर झोपलेल्या शाळकरी मुलाचा बुधवारी पहाटे जेसीबीखाली सापडून मृत्यू झाला.वाघवाडी फाटा ते इस्लामपूर रस्त्यावर हा प्रकार घडला.

 

हर्षवर्धन नागनाथ पाथरवट ( वय १३)असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी जीसीबी चालक
जयमगंल बैजनाथ सिहं (वय.२८ वर्षे मुळगांव हिमंतपूर जि.गोपालगंज-बिहार सध्या रा.वाघवाडी फाटा) याला अटक करण्यात आली.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी ; वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर अभियंता नगरमध्ये पाथरवट समाजाचे नागरिक गेली अनेक वर्षे दगड घडवण्याचे काम करत असतात.या दगड काम करणाऱ्या पाथरवट कुटुंबातील जीत वाहन बाढाईत (वय ५०) परशुराम विश्वनाथ (वय १२) व हर्षवर्धन नागनाथ पाथरवट हे तिघे एकत्रित रस्त्यावर गादी टाकून झोपले होते. झोपलेल्या स्थितीमध्ये आज सकाळी मृतदेह मिळल्याने एकच खळबळ माजली. हा घात की अपघात याबाबत उलट सुलट चर्चा होती.

 

 

बुधवारी झोपलेल्या अवस्थेत हर्षवर्धनचा
मृत्यूदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याच्या डोक्याची कवटी फुटली होती. तर बाजूला झोपलेले दोघेही सुरक्षित असल्याने घातपात की अपघात याबाबत सकाळपासून चर्चा होती.
अर्धी कवटी गायब असल्याने नेमका काय प्रकार आहे.पोलिसांनी याबाबत तपासाची मोहीम गतिमान केली होती. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत हर्षवर्धन याच्या उजव्या दंडावर जेसीबीच्या दाताचा व्रण दिसत होता.

 

घटनास्थळी कोणताही पुरावा मिळाला नव्हता.
याच परिसरात काँक्रीट रस्त्याचे काम व
रोडचे साईट पटीचे लेवल जे.सी.बी. (एम.एच.५० सी.१६३५ ) च्या सहाय्याने चालक जयमगंल बैजनाथ सिहं करत होता. त्याने बुधवारी पहाटे अपघात करून निघून गेला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.जेसीबीने डोक्यावर इजा झाल्याने हर्षवर्धन मृत झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

सकाळपासून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. रस्त्याच्या कामावरील जेसीबीच्या चालकाची पोलिसांनी उलटतपासणी केली असताना त्याने कबुली दिली आहे.

 

या तपासकामी पोलिस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, सहाय्यक फौजदार मारुती साळुंखे, गजानन घस्ते, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील चौधरी, पोलिस नाईक सचिन धोत्रे, कुबेर खोत, पोलिस कॉन्स्टेबल संकेत कानडे, पवन सदामते पोलिस हवालदार बजरंग शिरतोडे यांनी तपास कामात सहभाग घेतला.

 

 

दरम्यान घटनास्थळी पाथरवट यांचे दुकान आहे. तेथून काही अंतरावर त्यांचे राहते घर आहे. मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर तो शिकत असलेली शाळा होती.
रात्री झोपायला गेलेला मुलगा सकाळी उठलाच नाही. मुलाचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी आक्रोश केला. तर आजीला नातवाचा मृतदेह पाहून चक्कर आली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here