उमदी,संकेत टाइम्स : संख ता.जत येथे किराणा दुकाना बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या एकास ताब्यात घेत ८४ हजार रूपयाचा गुटखा जप्त केला आहे. उमदी पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली.
जत तालुक्यात बेकायदा गुटखा विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाण्याचे सा.पो.नि.पंकज पवार यांनी छापामारी सुरू केली आहे.संख येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेजवळील बमताराम मोदाराम देवासी वय २८ यांने मे.हनुमान किराणा स्टोअर्स बेकायदा गुटखा विक्री करत असल्याच्या माहितीवर पोलीसांच्या पथकाने छापा टाकला.
त्यात विक्रीला बंदी असलेली विमल पान मसाला,सुंगधी तंबाखू ,सुपर पान मसाला,एस ९९ सुंगधी मसाला,टायगर सुंगधी सुपारी,राजू सुपारी,हालो गोल्ड सुंगधी तंबाकू असा ८४ हजार रूपयाचा ८२.३ किलो मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी दत्तात्रय कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सा.पो.नि.पंकज पवार करत आहेत.