केंद्रिय मंत्री नितीन गडकरी शनिवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर
सांगली : भारत सरकार केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवार, दिनांक 26 मार्च 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 9.50 वाजता कवलापूर हेलिपॅड येथे आगमन व राजमती ग्राऊंड नेमिनाथनगर, सांगली कडे प्रयाण. सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या लोकार्पणास उपस्थिती, स्थळ – राजमती ग्राऊंड नेमिनाथनगर, सांगली. सकाळी 11.05 वाजता खरे क्लब हाऊस धामणी रोड कडे प्रयाण. सकाळी 11.15 ते 12 वाजेपर्यंत खरे क्लब हाऊस, धामणी रोड, दत्तनगर सांगली येथे 190 व्या वर्धापन दिनानिमित्त PNG सराफ पेढीच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी उपस्थिती.
दुपारी 12.05 वाजता उषकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, धामणी रोड कडे (तक्षशिला स्कूल जवळ, धामणी रोड, सांगली) प्रयाण. दुपारी 12.15 ते 1 वाजेपर्यंत उषकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स च्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत उषकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली येथे राखीव. दुपारी 1.30 वाजता कवलापूर हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता कवलापूर हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने भिवघाट हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता भिवघाट हेलिपॅड येथे आगमन व दुपारी 2.15 वाजता विश्वचंद्र मंगल कार्यालय खानापूर रोड भिवघाटकडे प्रयाण.
दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत शेतकरी मेळाव्यास उपस्थिती, स्थळ – विश्वचंद्र मंगल कार्यालय खानापूर रोड भिवघाट. दुपारी 4.35 वाजता भिवघाट हेलिपॅड कडे प्रयाण. 4.40 वाजता भिवघाट हेलिपॅड येथे आगमन. 4.45 वाजता भिवघाट हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने किवाले हेलिपॅड सिम्बॉसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी जिल्हा पुणे कडे प्रयाण.