जत शिक्षक भारतीने गटविकास अधिकारी यांची घेतली भेट

0
4
जत : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय पेंडिंग बिलाबाबत गटविकास अधिकारी दिनकर खरात यांची भेट घेत शिक्षक भारतीच्या शिष्ठमंडळाने प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय देयके मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत त्याला तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी,अशी मागणी केली.
शिक्षक भारतीने म्हटले आहे की, कोविड 19 च्या काळातील शिक्षक व त्यांच्या नातेवाईक यांची बिले होती कोविड बिलातून आयकर कपात करण्याची आवश्यकता नव्हती,तसा शासन आदेश आहे तरीही काही बिला तुन आयकर कपात करण्यात आली आहे.त्यांची कपात झालेली आयकरची रक्कम परत मिळावी.याबाबत गटविकास अधिकारी दिनकर खरात यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.

 

दरम्यान, दिनकर खरात म्हणाले,की शिक्षकांची वैद्यकीय बिलाना लवकर मंजुरी देऊ आयकर कपात बाबत टॅक्स सल्लागार सोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.
यावेळी जत तालुका शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत,जितेंद्र बोराडे, रावसाहेब चव्हाण,बाळासाहेब जायभाये इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here