राजे रामराव महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे राष्ट्रीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश

0

 

जत, संकेत टाइम्स

: येथील राजे रामराव महाविद्यालयातील इंग्रजी विभागाची विद्यार्थीनी कु. मालती शंकर वाघमोडे हिने राष्ट्रीय आभासी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. कु. वाघमोडे या महाविद्यालयात बी. ए. भागच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. राजे रामराव महाविद्यालय, इंग्रजी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या सयुंक्त विद्यमाने झाल्येल्या राष्ट्रीय इंग्रजी अभासी वक्तृत्व स्पर्धेमध्ये तिने उज्वल यश संपादन केले आहे.

 

Rate Card

 त्यामुळे महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कु. पहेल राजेश जैन (कीर्ती कॉलेज, मुंबई) हिने प्रथम क्रमांक (रोख रक्कम रु १५०० व प्रमाणपत्र) तर अनन्या शर्मा (युनिवर्सिटी महाराणी कॉलेज, जयपुर) हिने द्वितीय क्रमांक(रोख रक्कम १००० व प्रमाणपत्र) मिळवला आहे. सदर स्पर्धेसाठी प्रा. डॉ. श्रुती जोशी (विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर) आणि प्रा. रत्नाकर कोळी (शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळूंखे महाविद्याविद्यालय, कराड) यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.

 

विजेत्या कु. वाघमोडे विद्यार्थीनीला संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळूंखेसाहेब, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्रा. बनसोडे, डॉ. थोरबोले, प्रा. सन्नके, प्रा. यमगर, प्रा. कुडाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.