जत तालुक्यातील जि.प.शाळातील कन्नड व मराठी तसेच उर्दू शिक्षकांची रिक्त पदे भरणार ; शिक्षणमंत्री गायकवाड यांचे आश्वासन

0
जत,संकेत टाइम्स : मुंबई येथे जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड व मराठी तसेच उर्दू शिक्षकांची रिक्त पदे आणि शाळा खोल्यांच्या बांधकाम संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.याबाबतचे निवेदन त्यांना दिले.
जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील कन्नड, मराठी तसेच उर्दू माध्यम शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ती त्वरित भरली गेली नाही तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या दर्जेदार शिक्षणास अनेक गरीब व होतकरू विद्यार्थी मुकणार आहेत.

 

शिवाय जिल्हा परिषद  शाळांकडे ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला असताना रिक्त पदे त्वरित भरली गेली नाहीत तर जिल्हा परिषद शाळा ओस पडण्यास वेळ लागणार नाही.

 

याबरोबरच येथील जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम होऊन नव्या व प्रशस्त अशा वर्ग खोल्यांची निर्मिती होणे गरजेचे आहे. शालेय वातावरण योग्य राहण्याच्या दृष्टीने सुसज्ज वर्गखोल्या देखील महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे सुयोग्य वर्गखोल्या व इतर बाबी यांची पूर्तता त्वरित होणे गरजेचे आहे. वरील सर्व संदर्भीय विषयानुसार शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

 

दिलेल्या निवेदनाचा विचार करून त्वरित अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिले आहे. यावेळी आमदार सांवत यांच्यासह कांतेश सन्नोळी सर, धरेप्पा कट्टीमनी सर, राजेंद्र बिरादार सर, गांधी चौगुले सर, चंद्रशेखर कारकल सर उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.