थकबाकीदारांसाठी वसूली पोत्साहन निधी योजना 

0
4

जिल्हा बँकेच्या योजनेचा लाभ घ्या ; प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब
जत,संकेत टाइम्स : थकबाकीदार शेतक-यांनी वसुली प्रोत्साहन निधी योजनेचा लाभ  घ्यावा,असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व मन्सूर खतीब यांनी केले.थकबाकी वसुली व कर्ज वाटपाच्या अडचणी संदर्भात गुरूवार दिनांक २४ रोजी जत शाखा कार्यालयामध्ये सचिव / इन्स्पेक्टर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून विकास संस्था मार्फत शेतकऱ्यांना पिक उत्पनासाठी शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी अल्प/ मध्यम/दिर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केला जात आहे. विकास संस्थानी दिलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्याकडून वसूल करून वेळेत परतफेड करणे अपेक्षित आहे.

 

मात्र वांरवार दुष्काळी परिस्थिती ,हवामान बदल ,वादळ ,अवेळी पाऊस ,गारपीट व कोरोना यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अपेक्षित उत्पन्न न आलेने तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जाची वेळेत परतफेड करता आली नाही,परिणामी शेतकऱ्याकडील कर्जाच्या थकबाकीत मोठी वाढ झालेली आहे. अशा दिनांक-३१ डिसेंबर २०२१
अखेर ८२ विकास संस्थेकडे १२२.३८ (कोटी) थकबाकी आहे.

 

नैसर्गिक आपत्तीने शेतकरी आडचणीत आलेने दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सुट किंवा सवलत मिळावी म्हणून मागणी होती.त्यासाठी पाठपुरावा म्हणून आम्ही संचालक मंडळामध्ये ठराव मांडून शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती केली होती. बॅकेचे चेअरमन आ.मानसिंगराव नाईक व व्हा.चेअरमन श्रीमंती जयश्रीताई पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी संमती दिली आहे.

 

दिनांक-३०/०६/२०१८ अखेर थकीत असणारा शेतकरी (पीक कर्ज अल्प/ मुदत/ मध्यम व दिर्घ मुदत कर्ज) यांचे ६% प्रमाणे व्याजने आकारणी करून कोणतेही दंड व्याज न घेता कर्ज भरून घेऊन खाते रेग्युलर करता येणार आहे.तसेच नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व कर्जासाठी व्याजदरामध्ये २ % रिबेट देण्यात येणार आहे.जर १०१ प्रकरण झाले असेलतर त्याचा फक्त खर्च वसूल केला जाणार आहे.त्यावर कोणतेही दंडव्याज घेतले जाणार नाही.

 

या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱियांनी घ्यावा असे आवाहन जमदाडे व खतीब यांनी केले आहे.बँकेचे धोरण हे शेतकऱ्यांचे हिताचे व उपयोगी राबवणेचा प्रयत्न आम्ही करत आहोत.या योजनेचा लाभ न घेणाऱ्या शेतकऱ्यावर १०१ वी कार्यवाही करून थकीत कर्जे वसूल करण्यात येणार आहेत.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबधित विकास सोसायटीशी संपर्क करून सचिव,फिल्ड ऑफिसर
,तालुका विकास अधिकारी किंवा आम्हा संचालकांशी संपर्क साधावा,असेही जमदाडे,खतीब यांनी म्हटले आहे.

 

 

यावेळी तालुका विकास अधिकारी आर.टी.कोळी,बँकचे वसली अधिकारी आर.टी.नाटेकर व बँकेचे सर्व फिल्ड ऑफिसर व सेवा सोसायटीचे सचिव उपस्थित होते.स्वागत
आर.टी.कोळी यांनी केले तर आभार सचिव नाथा मोरे यांनी केले.
जत येथील जिल्हा बँकेच्या आढावा बैठकीत बोलताना संचालक प्रकाश जमदाडे बाजूस अधिकारी
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here