कास्ट्राईबतर्फे सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार जाहीर

0
सोन्याळ : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त
कास्ट्राईब शिक्षक संघटना सांगलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १५ एप्रिल रोजी महिला शिक्षिकांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे. वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षिकांची नावे जाहीर केली आहे.
    सांगली जिल्हा काष्ट्राईब शिक्षक संघटनेकडून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षी कोरोनामुळे पुरस्कार देणेस  विलंब झाला असून येत्या 15 एप्रिल 2022 ला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी सन 2021 च्या पुरस्कारप्राप्त महिला शिक्षकांची नावे जाहीर केले आहे ते पुढील प्रमाणे आहे. सौ.सुषमा देशमाने, जि. प शाळा, सुखवाडी पलूस, सौ.स्वाती कोळी सिटी हायस्कूल सांगली, सौ शुभांगी शिंगे के. सी. सी शाळा सांगली, सौ.सुरेखा पाटील जि. प शाळा भवानी नगर वाळवा,

 

सौ अस्मिता भोकरे जि. प शाळा कुपवाड, सौ प्रतिमा कांबळे जि. प. शाळा नरवाड, सौ.राणी बळ्ळारी जि. प.शाळा मुचंडी जत, सौ.नुरजहॉ मुल्ला जि. प. शाळा भाळवणी आटपाडी, खानापूर, सौ. मिनाज नदाफ जि. प. उर्दू शाळा कवठेपिरान, सौ.बीना माने जि. प शाळा सावंतपूर वसाहत कडेगाव अशा एकूण दहा महिला  शिक्षिकांची नावे जाहीर करण्यात आले आहे.

 

सावित्रीबाई फुले यांचे स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र  देऊन राज्य आणि जिल्ह्यातील मान्यवरांच्याहस्ते व प्रमुख उपस्थितीत  गौरविण्यात येणार आहे  अशी माहिती काष्ट्राइबचे जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी दिली. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष लखन होनमोरे, सचिव विद्याधर रास्ते, कोषाध्यक्ष दयानंद सरवदे,उपाध्यक्ष प्रदीप गवळी, रफीक पटेल, मुख्यसंघटक अशोक हेळवी, महिला आघाडी प्रमुख विनोदिनी मिरजकर, मुमताज खतीफ, संगीता कांबळे, पौर्णिमा होटकर, मिरज तालुका अध्यक्ष परशुराम जाधव  आदी शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.