खाजगी चारचाकी वाहनाकरिता नविन मालिका गुरूवार पासून सुरू  

0

सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या खाजगी चारचाकी वाहनांकरिता एम एच 10 डी व्ही ही नवीन मालिका गुरूवारदि. 31 मार्च 2022 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.

 

        एम एच 10 डी व्ही या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनासाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या ठिकाणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत – आधार कार्डमतदार ओळखपत्रपासपोर्टपॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत,  ई-मेल आयडी आवश्यक आहे.

 

पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 1 एप्रिल 2022 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

Rate Card

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.