कुडणूरच्या जागृत्त श्री हनुमान देवाची यात्रा आजपासून

0
डफळापूर,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील जागृत हनुमान मंदिरामुळे प्रसिध्द झालेल्या कुडणूर मधील श्री.हनुमान देवाची यात्रा कोरोना प्रभाव ओसरल्यानंतर गेल्या तीन वर्षानंतर यावर्षी प्रतिपदा गुढीपाडव्याला संपन्न होत आहे.
कवटेमहाकांळ- जत सिमेवर्ती असणाऱ्या कुडणूर येथे स्वातंत्रपुर्व काळापासून जागृत हनुमान मंदिर आहे.

 

भक्ताच़्या नवसाला पावणारा,भक्ताच्या मनोकामना पुर्ण करणारा हनुमान म्हणून परिसरातील गावा-गावांत प्रसिध्द आहे.जत- सांगली मार्गावर कोकळे(ता.कवटेमहांकाळ) पासून दोन किलोटर तर डफळापूर पासून पाच किलोमिटर अंतरावर असणाऱ्या या मंदिराचा जिणोध्दार व परिसरातील दर्जेदार बांधकामामुळे या मंदिराचा परिसर भक्तिपुर्ण बनला आहे.

 

जेमतेम दोन हाजार लोकसंख्येचे गाव व्यवस्थेने दुर्लक्षीत पंरतू येथील प्रसिध्द हनुमान मंदिरामुळे दूरवर नावलौकिकास प्राप्त झाले आहे.
गावच्या मध्यवर्ती वडापात्रा लगत असणाऱ्या मंदिराचे पुर्वीचे बांधकाम काढून कुडणूर ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांच्या पुढाकाराने लोकवर्गणी व शासकीय निधीच्या माध्यंमातून नव्याने मंदिर बांधकाम केले आहे.मंदिर,सभामंडप, परिसरात पेग्विग बॉल्क बसवून मंदिर परिसराला तारेचे कुंपन बांधले आहे.

 

चुकीला शासन व निशिम भक्ती करणाऱ्या जिवनात आंनद निर्माण करणारा हनुमानाची ख्याती दूरवर पोहचली आहे.दर शनिवारी येथे यात्रेप्रमाणे भाविकाची गर्दी असते.अभिषेक,हनुमान चालिसा वाचन, धार्मिक विधीवत पुजा अर्चा ,भजनाने मंदिर परिसर दूमदूमन जाते.

 

कुडणूर ग्रामपंचायत व यात्रा कमिटी कडून यात्रा भरविली जाते . कुडणूर गावाचे ग्रामदैवत असल्याने येथील नोकरीनिमित्त परगावी असणारे नागरिकही यात्रेसाठी आवर्जून येतात.यात्रा काळात गावात भक्तिपुर्ण वातावण असते.
यात्रा कार्यक्रम असा
शुक्रवार १ एप्रिल ला :
सकाळी सायकल,धावणे (मोठा,छोटा गट),स्लो सायकल स्पर्धा
सायंकाळी ४.३० वाजता: मंदिरांमध्ये मानाची पुजा श्री.अज्ञान दशरथ पांढरे यांच्या हस्ते
रात्री 9  धनगरी ओव्याचा भरगच्च कार्यक्रम
शनिवार ता २ एप्रिलला : यात्रेचा मुख्य दिवस
पहाटे 3 ते 5 वाजेपर्यत ‘श्री’स दंडवत
सकाळी 7 ते 9 सालाबादप्रमाणे पंचांग वाचन व लिंब साखर खाणेचा कार्यक्रम
सकाळी 10 ते 1 वाजेपर्यत खिलार जनावराचे भव्य प्रदर्शन
सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यत जंगी कुस्त्याचे मैदान
यात्रेसाठी विशेष सहकार्य सुभाषराव गायकवाड,धनाजी भोसले,अनिकेत शिंदे,अशोक पाटील,आनंद कांबळे यांना केले असून श्री.हनुमान यात्रा कमिटी,ग्रामपंचायत कुडणूर यांच्यावतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
डफळापूर : कुडणूर ता.जत येथील प्रसिध्द श्री.हनुमान देवस्थान
मंदिराचे फोटो वापरा
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.