तापमान वाढीने लालबुंद रसाळ कलिंगडच्या मागणीत वाढ  

0
6
जत,संकेत टाइम्स : जत शहरात सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्‍या उष्‍म्‍याने शहरवासिय हैराण झाले असून, शरीराला गारवा देणार्‍या रसदार कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. कलीगंड खाल्याने शरीरातील पाण्याची पातळी वाढते.
उष्णतेपासून काही काळ आराम मिळतो. त्‍यामुळे लालबुंद टरबुजाच्या दरात वाढ झाली आहे.

उन्हाळ्याची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, शरीराला गारवा देणाऱ्या रसाळ फळांच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या बाजारात लालबुंद कलिंगड मागणी वाढली आहे. त्‍यामुळे दर देखील तेजीत आहेत.ते २० ते ३० रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहेत.

 

किरकोळ बाजारात गुणवत्तेनुसार एका  किंमत 70 रुपये आहे. कर्नाटकसह जत तालुक्यातील आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतातील तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून कलिंगड बाजारात येतात. फ्रुट सॅलेड आणि ज्यूस बनविण्यासाठी कलिंगडला मागणी आहे. स्वस्त आणि मस्त असलेल्या कलिंगड घेण्यासाठी दुकानात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी लालबुंद गारेगार कलिंगड विक्रीचे स्‍टॉल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here