जत,संकेत टाइम्स : राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थी दशेतील आदर्श नागरिक घडवणारी संस्था आहे. श्रम, सेवा, स्वच्छता, प्रबोधन व राष्ट्रीय एकात्मता जगायला शिकवणारी ही एक आदर्श योजना असल्याचे मत जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड, सरपंच विद्या सावंत, बनाळी तंटामुक्त समितीचे आण्णासो सावंत, बाबासाहेब कोडग, प्रभाकर जाधव व रवींद्र सावंत उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पंचायत समिती सदस्य, रवींद्र सावंत म्हणाले, राजे रामराव महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग बनशंकरी मंदिर परिसरामध्ये अतिशय उत्कृष्ट श्रमदान, स्वच्छता व वेगवेगळे प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन गावाच्या विकासात भर घातली आहे. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड, प्रभाकर जाधव यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला बनाळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय जाधव, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सदस्य डॉ. निर्मला मोरे, डॉ. निशाराणी देसाई, प्रा. हिरामण टोंगारे, अशोक बोगुलवार, गोविंद साळुंखे, राहुल कांबळे, नवनाथ लवटे, अतुल टिके, अनुप मुळे, राजेश सावंत, अभयकुमार पाटील, ओमकार कुडाळकर, शिक्षकेतर कर्मचारी अदीक घुगरे, उमेश सावंत व बापू सावंत, सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
बनाळी राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना आमदार विक्रमसिंह सावंत.