वाढती महागाई,इंधनवाढीच्या निषेधार्थ जतेत कॉग्रेसचे आंदोलन

0
जत,संकेत टाइम्स : वाढती महागाई, अवाढव्य इंधनवाढ व बेरोजगारीचा वाढता आलेख हीच मोदी सरकारची गुणवैशिट्ये आहेत. या महागाईमुळे जगावं कि मरावं हा सवाल आता सर्वांपुढे पुढे पडला आहे,असे उद्गार आमदार विक्रमसिंह सांवत यांनी काढले.  जत येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात महागाई मुक्त भारत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.यावेळी आमदार सांवत काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत आंदोलनात सहभागी होते.

 

आ.सांवत पुढे म्हणाले, सध्या देशात वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. इंधनाच्या दरामध्ये रोजच वाढ होत चालली आहे.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही काळ कोणतीच इंधनदरवाढ मोदी सरकारने केली नाही. मात्र निवडणूका पार पडताच केंद्राने आपला खरा चेहरा दाखवयाला सुरुवात केली. नोव्हेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच २२ मार्च दिवशी इंधनाच्या भावात वाढ करण्यात आली आणि तेव्हापासून सतत भाव वाढतच आहेत.
गॅस तसेच खाद्यतेलाचे भावही गगनाला भिडले आहेत. १ एप्रिल अर्थात आजपासूनच औषधांचे भावही वाढणार आहेत. मोदी सरकार जनतेला महागाईच्या जाळ्यात लोटतंय त्याविषयी त्यांना काही वाटत नाही या गोष्टीचे खूप नवल वाटतेय,असेही सांवत म्हणाले.

 

यावेळी केंद्रातील मोदींच्या काळया कर्तृत्वाचा निषेध केला. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराय बिराजदार, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जतेत कॉग्रेसच्या वतीने वाढती महागाई,इंधनवाढीच्या निषेधार्थ जतेत कॉग्रेसचे आंदोलन करण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.