येळवी सोसायटीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

0
येळवी : येळवी सर्व सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुक 2021-22 ते  2026-27 करिता शेतकरी सहकारी विकास पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचारास प्रारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, सोसायटीचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते पंचाक्षरी अंकलगी, माजी सरपंच दादासाहेब माने, उपसरपंच सुनिल अंकलगी, माजी उपसरपंच मच्छिंद्र खिलारे, माजी चेअरमन रावसाहेब जाधव, दीपक अंकलगी, मारुती मदने, संतोष पाटील, यांच्यासह सर्व उमेदवार सभासद उपस्थित होते.

 

प्रकाश जमदाडे म्हणाले,सोसायटी चांगली प्रभावीपणे चालली पाहिजे याकरिता चांगले उमेदवार सोसायटीत निवडून गेले पाहिजेत. सर्वच उमेदवारांना आपण सर्व जण साथ द्याल असा आम्हाला विश्वास आहे.येळवी सोसायटी ही जत तालुक्यामध्ये कर्जवाटप,भांडवल यामध्ये नावलौकिक सोसायटी म्हणून ओळखली जावी यासाठीच सर्व उमेदवाराकडून प्रयत्न करणार आहोत.

आपल्या पॅनलच्या माध्यमातून सोसायटीचा कारभार पारदर्शक, समाजाभिमुख आणि शेतकऱ्याच्या विकासाच्या दृष्टीने केला जाईल. या पॅनलचा प्रमुख उद्देश शेतकरी कुटुंबात युवा उद्योजक निर्माण झाले पाहिजेत असा आहे.  याचबरोबर शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, माती व पाणी मोफत परीक्षण.विविध प्रकारचे शेतीविषयक प्रशिक्षण, शेती-उद्योगधंद्यांना चालना देण्याचा प्रयत्न आसुन सोसायटीत पारदर्शक कारभार आणणार आसल्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले.

शेतकरी सहकारी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना उच्चांकी मतदानाने निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.