उमदीत एकाचा विहिरीत पडून मृत्यू
Post Views : 366 views
माडग्याळ(रमेश चौगुले) : उमदी (ता. जत) तेथील चंद्रकांत बागडे यांच्या शेतातील विहिरीत राजअहमद बादशा पठाण (वय ४० रा.उमदी ता.जत) यांचा मृतदेह आढळून आला. शनिवारी पाचारण दुपारी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी घातपात की आत्महत्या, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे.जत-चडचण रस्त्यावर उमदीपासून तीन किलोमीटर अंतरावर चंद्रकांत रामा बागडे यांच्या शेतात विहीर आहे.
शनिवारी दुपारी बागडे गुढीपाडव्यानिमित्त विहिरीत परडी सोडण्यासाठी गेले असताना पाण्यात मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याची माहिती सरपंच शिंदे यांना दिली. शिंदे यांनी तत्काळ उमदी पोलिसांना ही माहिती दिली. उमदी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या नसल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी सांगलीतील आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले.या पथकाने रविवारी दुपारी उमदी येथे येऊन मृतदेह विहिरीतुन बाहेर काढला.
जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.याबाबत चंद्रकांत रामा बागडे यांनी

उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आहे.अधिक तपास सुरू आहे.