अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने जतला १.६० लाखाचा निधी

0
जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने धार्मिक स्थळे सुशोभीकरण व इतर विविध विकासकामांना १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.आमदार विक्रमसिंह सांवत यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

 

अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अनेक योजना राबवल्या जातात.

 

या अंतर्गत जत तालुक्यातील विविध गावांमध्ये समाजमंदिरांची उभारणी असेल अथवा डागडुजी असेल तसेच मागासवर्गीय वस्तींमध्ये अंतर्गत सुधारणा करणे या विकासकामांना सुमारे १ कोटी ६० लाखांचा निधी महाविकास आघाडीतर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सदरची विकासकामे लवकरच मार्गी लावली जातील,असेही सांवत म्हणाले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.