पांढरेवाडीत अडीच लाखाचा गांज्या जप्त

0
Post Views : 1,652 views
उमदी,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील पांढरेवाडी येथे गांज्या शेतीवर उमदी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने छापा टाकला.याप्रकरणी आंबादास शेशाप्पा तांबे वय ४० यांना ताब्यात घेत २५ किलो ७०० किलो वजनाचा २ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा गांज्या जप्त केला.

 

 

अधिक माहिती अशी, पांढरेवाडी येथील अंबादास तांबे यांनी गांज्याची शेती केली असल्याची माहिती खबऱ्याद्वारे सा.पो.नि.प्रशांत निशाणदार यांना मिळाली होती.त्या अनुषंगाने निशाणवार व उमदी पोलीस ठाण्याचे सा.पो.नि.पंकज पवार यांच्या पथकांने छापा टाकला.त्यात तांबे यांच्या शेतामध्ये लहान मोठी २० झाडे आढळून आली.त्याचे वजन २५ किलो ७०० ग्रँम भरले असून बाजार भावाप्रमाणे त्यांची किंमत २ लाख ५७ हजार रूपये आहे.

 

ही ओली गांज्याची झाडे पंचनामा करून जप्त करत संशयित तांबे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सा.पो.नि.पंकज पवार करत आहेत.
पांढरेवाडी ता.जत येथे जप्त करण्यात आलेली गांज्याची रोपे,पोलीस पथक व संशयित
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.