जत- वायफळ रस्त्यावरील अपघातात बालक ठार
जत : जत -अचकनहळळी ते वायफळ या मार्गावर टेम्पोच्या धडकेत एका शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. राहुल भाऊसाहेब शिंदे (वय १२,रा.कवटेमहाकांळ) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
बेजबाबदार व निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालक तानाजी धोंडीराम कोडग (आवंढी, ता.जत) यांच्यावर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत – अचकनहळळी -वायफळ या रस्त्या नजिक शिंदे यांचे घर आहे. दुपारी राहुल शिंदे हा आपले मित्र अथर्व सोलंकर यांच्यासोबत सायकलवरून जात होता. दरम्यान समोरून तानाजी कोडग यांचा टेम्पो भरधाव वेगाने येत होता.
यावेळी राहुलच्या सायकलीला टेम्पोने जोरदार धडक दिली. यात राहुल जागीच ठार झाला.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पीएसआय लवटे करत आहे.
