संखमध्ये साहिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा,सत्कार सोहळ्याचे आयोजन

0
७ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन
संख, संकेत टाइम्स : जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील यांचे नातू, जी. आर. पाटील यांचे चिरंजीव युवा नेते साहिल पाटील यांच्या आज २१ व्या वाढदिवस, त्यानिमित्य,सात एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन विविध स्पर्धा व सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

संख येथील आर. के. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवारी पाच वाजता वृक्षारोपनाने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती आर. के. पाटील राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरवबस विरक्त मठाचे श्री महेश देवरु, मंत्री पाटील यांचे स्वीय सहाय्यक अमोलराव डफळे, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, भाजपचे नेते डॉ. रवींद्र आरळी, माजी जि. प. अध्यक्ष आण्णासाहेब गडदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील, श्रीकांत पाटील, राजेंद्र कननुरे, सोमन्ना हाक्के,  परमेश्वर व्हनमराठे, अप्पर तहसिलदार सुधाकर मागाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार,  श्रीशैल बिरादार,  आशिष खडीकर, डॉ. बुरुकले, उपस्थित राहणार आहेत.
सहा वाजता वेट लिफ्टिंगचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन सुरेश खोत यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मल्लेश मोटे उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी सात वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत युवा नेते साहिल पाटील यांच्या २१ व्या वाढदिवसानिमित्य भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 शुक्रवारी भव्य क्रिकेट स्पर्धा
युवा नेते साहिल गुरूबसव पाटील यांच्या २१ व्या वाढदिवसानिमित्य शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जी. आर. पाटील चषक- २०२२ भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. आठ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान या स्पर्धा पार पडणार आहेत.

 

जी. आर. पाटील चषक- २०२२ हा चषक देवून विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.  प्रथम बक्षीस एक लाख ११ हजार , दुसरे बक्षीस ५५ हजार, तिसरे २२ हजार तर चौथे   बक्षीस ११ हजार राहणार आहे.
स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती आर. के. पाटील राहणार आहेत तर सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी पाटील यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, डॉ. रवी मेत्री, श्रीशैल बिरादार, सोमशेखर जमशेट्टी, डॉ. संभाजी जाधव,  अमोघसिद्ध पांढरे, प्रवीण अवरादी,  परमेश्वर व्हनमराठे, किरण पाटील, बी. आर. पवार, विजय बिरादार, प्रसाद पुजारी, श्रीशैल पुजारी, आप्पा थोरात, अशोक पुजारी उपस्थित राहणार आहेत.
सर्व कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री गुरुबसव कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, जी. एन. बॉयज ग्रुप, जय भवानी नवरात्रौतसव तरुण मंडळ, ओम ग्रुप , जय भीम तरुण मंडळ, महर्षी वाल्मिकी तरुण मंडळ, संख यांनी केले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.