उमदी यात्रेत भाविकांनी किंमती वस्तू जपण्याचे पोलिसांकडून आवाहन

0
उमदी, संकेत टाइम्स : उमदी ता.जत येथील श्री मलकारसिध्द देवाच्या यात्रेत आलेल्या महिला भाविकाचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले.

 

उमदीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री मलकारसिध्द देवाच्या यात्रेत पालखी भेट सोहळ्यात ही घटना घडली आहे.याबाबत पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.दरम्यान भाविकांनी आपले दागिने, मोबाईल, किंमती वस्तू जपाव्यात.

 

आम्ही सतर्क आहोत, सर्व प्रकारे दक्ष आहोत, तरीही
चोरीची घटना अथवा संशयास्पद इसम दिसल्यास तात्काळ ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सा.पो.नि.पंकज पवार यांनी केले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.