वायफळ सोसायटीत विजय मिळवू ; रमेश साबळे

0
जत : वायफळ(ता.जत) सर्व सेवा सोसायटी निवडणूक चुरसीने होत आहे.
सर्वपक्षीय स्थानिक आघाडी प्रणित जय किसान परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत सोनारसिद्ध मंदिर येथे झाला.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.या पँनेलमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना व सर्व भागातील उमेदवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असून हे सर्व उमेदवार लोकांच्या पसंतीने दिलेले आहे. कार्यतत्पर व विकासाभिमुख उमेदवार असून त्यामुळे ही निवडणूक जिंकू असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.यांनी केले.

 

यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रमेश साबळे बनाळी सर्व सेवा सोसायटीचे माजी संचालक विजय यादव,शशिकांत  यादव, प्रगतशील शेतकरी धनाजी यादव, नामदेव यादव,सुधाकर पाटील प्रमुुख उपस्थित होते.
सोसायटीत शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करण्याबरोबरचं,शेतकऱ्यांना लागणारे जेसीबी,ट्रॅक्टर टेम्पो,त्याचप्रमाणे पीक कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज गतीने मिळवून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार प्रयत्न करतील.सभासदांनी आमच्या पॅनेलला मतदान करून सेवा करण्याची संधी द्यावी,असे आवाहन यावेळी रमेश साबळे यांनी केले आहे.

 

यावेळी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे,अरूण पाटील,बबन इनामदार, आर.डी.यादव, मनसेचे नामदेव यादव, निवृत्ती यादव,पंच गुंडा पाटील, तानाजी पाटील,संतोष पाटील,भुषणकुमार साबळे, सुनिल साबळे,मलिकार्जुन पाटील, शेंडे,अमीर शेख,अमर यादव,एम डी निर्मल,मोकाशी,सतिश पाटील, आबासाहेब यादव सह सर्व उमेदवार उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.