सिल्वर ओकवरील हल्ला निंदनीय ; प्रकाश जमदाडे

0

 

जत : राजकारणातील आणि समाजकारणातील जेष्ठ नेते माजी कृषी मंत्री, शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी झालेला हल्ला महाराष्ट्रांची संस्कृती नाही.अशा हल्ल्याचे निषेध,संशयितावर कारवाई करावी,अशी मागणी जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.

Rate Card

जमदाडे म्हणाले,गेल्या अनेक दशकाच्या  संसदीय राजकारणामध्ये महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर भारत देशातील सर्व सामान्य नागरिक , शेतकरी ,कामगार , उद्योजक, छोटे मोठे व्यापारी व नोकरवर्ग यांच्या अडीअडचणीचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्याचे काम पवार साहेब यांनी केलेले आहे.एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबतीत अनेक वेळा त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका घेऊन हा संप मिटावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत . असे असतानाही काही विघ्नसंतोषी लोकांनी सर्वोच्च नेत्याच्या घरावरती हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हा हल्ला निंदनीय ,भ्याड , खेदजनक आहे.या हल्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी ठीक 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराष्ट्रप्रेमी , राष्ट्रवादीप्रेमी व शरद पवार साहेब प्रेमी यांनी उपस्थित राहावे,असे आवाहनही जमदाडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.