१०२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेण्या-या एका व्यापाऱ्यास अटक

0
Post Views : 142 views

 

मुंबई : महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाने जवळपास १०२ कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपुट टैक्स क्रेडिट (ITC) घेऊन शासनाच्या १४ कोटींच्या कर महसुलाची हानी करण्या-या व्यक्तीस अटक केली आहे.

 

 

मे. समिक्स पुरवठादार व्यापा-यांकडून रु.८ कोटींचा महसुल मिळविण्यात महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागास यश आले आहे.

 

मे. समिक्स विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमे अंतर्गत मे. समिक्स या कंपनीचे प्रोप्रायटर यांस ०7 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली. ह्या प्रकरणाबाबतचा तपास सुरु आहे.

 

Rate Card

महानगर दंडाधिका-यांनी या व्यापा-यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.ही धडक कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त श्री. अमोल सुर्यवंशी यांनी श्री. निळकंठ एस. घोगरे, राज्यकर उपआयुक्त व

 

श्री. राहुल व्दिवेदी (भा.प्र.से.) राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण अ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली केली.सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधानांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभाग कर चुकवणा-या व्यापा-यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी करणा-यांना कडक इशारा दिलेला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.