सांगोला येथे विद्यार्थी,पालकांसाठी १७ एप्रिलला कार्यशाळेचे आयोजन : डॉ.पियूषदादा साळुंखे – पाटील 

0
सांगोला  : शालेय विद्यार्थ्यांचे करिअर निवडताना पालकांचा उडणारा गोंधळ, शिक्षणाच्या पद्धती, विद्यार्थ्यां समोरील आव्हाने, अशा अनेक विषयांवर रविवार दि. 17 एप्रिल रोजी इ. 9 वी. ते 11 वी. च्या विद्यार्थी व पालकांसाठी  कार्यशाळा अर्थात मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी  विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यशोजीवन एज्युकेशन प्रा. ली. सांगोला संचालित ब्राईट फ्युचर आय. आय. टी. आणि मेडिकल अकॅडमीचे चेअरमन डॉ. पियूषदादा साळुंखे – पाटील यांनी केले आहे.
यशोजीवन एज्युकेशन प्रा.ली. सांगोला संचालित ब्राईट फ्युचर आय. आय. टी. आणि मेडिकल अकॅडमी च्या वतीने रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना चेअरमन डॉ. पियूषदादा साळुंखे- पाटील बोलत होते. या पत्रकार परिषदेस यशोजीवन एज्युकेशन प्रा. ली. सांगोला संचालित ब्राईट फ्युचर आय. आय. टी. आणि मेडिकल अकॅडमीचे सचिव अनिल येलपले, राजीव कुमार सर, भजन कुंधारीया, कमलेश कुमार, दिलीप राठोड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना चेअरमन डॉ. पियूषदादा साळुंखे – पाटील म्हणाले, अत्याधुनिक युगात शिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत. नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत असल्याने तेवढीच आव्हाने विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर उभे आहेत. त्या आव्हानाला सामोरे जात असताना पालकांची व विद्यार्थ्यांची चूक होऊ नये म्हणून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने मुंबई येथील नामवंत शिक्षण तज्ञ  विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनार च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला निश्चित कलाटणी मिळेल असा विश्वास व्यक्त करीत, दुष्काळाचे नाव पुसून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपले भवितव्य उज्वल करीत तालुक्याची एक नवी ओळख निर्माण करण्याचे काम केले आहे. परंतु ही नवी ओळख निर्माण करताना आपला गाव, तालुका,जिल्हा आणि राज्ये सोडून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी अन्य जिल्हे, राज्यात आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबांची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि संस्कार या पासून अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून, यशोजीवन एज्युकेशन प्रा. ली. सांगोला संचालित ब्राईट फ्युचर आय. आय. टी. आणि मेडिकल अकॅडमी च्या माध्यमातून आपल्या तालुक्यात गुणवत्तापूर्ण आणि उत्तम दर्जाची शिक्षणाची मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी बाहेर गावी जाण्याची गरज भासणार नाही.
Rate Card
पुढे बोलताना चेअरमन डॉ. पियूषदादा साळुंखे – पाटील म्हणाले,स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे. आपल्या तालुक्यातील मुलांच्या कला गुणांना वाव मिळाला पाहजे. यासाठी तालुक्यातील भविष्याचे वेध घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याच तालुक्यात शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सांगोला तालुका हा दुष्काळी परिस्थितीचां तालुका म्हणून ओळखला जात असला तरी, या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बाबतीत मोठी गरुड झेप घेतली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देण्यासाठी कमी फी मध्ये उत्तम क्वालिटीची शिक्षणाचीसंधी उपलब्ध करून दिले आहे.
आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे अधिकारी व डॉक्टर व्हावे असे अनेकांना वाटत, आज अनेक पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.  शैक्षणिक फी कमी आणि क्लासेस च्या माध्यमातून अनेक सुविधा विद्यार्थ्यांना अधिकाधिक देण्याचा प्रयत्न केला असल्याने विद्यार्थ्यांना आता इतर राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जे पुणे- लातूर- सांगली- मुंबई, बारामती या सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल तेच ज्ञान आता आपल्या सांगोल्यात मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून उर्वरित विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असेही आवाहन चेअरमन डॉ. पियूषदादा साळुंखे – पाटील यांनी केले आहे.
अकॅडमीचे सचिव अनिल येलपले म्हणाले, ब्राईट फ्युचर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याचा प्रयत्न होणार आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकला पाहिजे, फक्त टिकला नाही तर यशस्वी झाला पाहिजे ही भूमिका अकॅडमीचे आहे. आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांच्यातील टॅलेंट ला वाव मिळवून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. आपल्या तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थी हे अधिकारी डॉक्टर घडतील यादृष्टीने प्रयत्न केला जाईल असा विश्वास देत, सांगोल्याच्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण व दर्जदार शिक्षण मिळत नव्हते. ही गरज ओळखून या ठिकाणी क्लासेस सुरू केल्या आहेत. क्लासेस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होऊन आपल्या तालुक्यात त्यांना शिक्षणाची मोठी संधी निर्माण होईल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असेही  त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.