माडग्याळ(रमेश चौगुले) : माडग्याळ ता.जत येथील इतिहासकालीन संदर्भ असलेले श्री.मल्लिकार्जुन देवाची यात्रा महोत्सव सालाबादप्रमाणे आज सोमवार ता.१८ ते शनिवार ता.२३ एप्रिल पर्यत भरत आहे.गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच यात्रा भरत असल्याने भाविक,ग्रामस्थात उत्साह संचारला आहे.
ऐतिहासिक महत्व या मंदिराला असल्याने मोठा भाविक वर्ग आहे.यात्रेनिमित्त यात्रा कमिटीकडून सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे.सलग सहा दिवस धार्मिक कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक व करमणूकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रा काळातील सहाही दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेचे कार्यक्रम असे,
सोमवार 18/04/2022 श्री मल्लिकार्जुन देवाची भव्य मिरवणूक गावापासून यात्रा मंदिरापर्यंत सांय.7 वा.,
मंगळवार 19/04/2022
ढोलाची गाणी धनगरी ओवी पंचक्रोशीतील संघ व घुळी महाराज गायन संघ (शिरवळ ता. दक्षिण सोलापूर) जोतू म्हाराया बिरेश्वर गायन संघ (माडग्याळ) बिरू हाक्के रात्री 9 वा.,
ढोलाची गाणी बिळ्यीनिसध्द गायन संघ (भिवर्गी)बिरेश्वर गायन संघ (माडग्याळ) प्रभू चौगुले रात्री 9 वा.,
शुक्रवार 22/04/2022 हास्य भरित व कौटुंबिक नाटक गुब्बी कपंनी राजण्णा जेऊरगी यांचे रचित नाटक रात्री 10 वा.नांव: कुडक कल्या-शिडक मल्ली,
शनिवार 23/04/2022| सकाळी 8 ते 12 गुळवाटप कार्यक्रम व यात्रा समाप्ती यात्रा काळात दररोज १२ ते ५ महाप्रसाद व रात्री ८.०० वा. आरती होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 9021821542, 8605180278 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.