ब्राईट फ्युचर ॲकॅडमी क्रांती घडवेल ; प्रा.आदित्य व्यास | पुणे,मुंबई,लातूर,कोल्हापूरच्या बरोबरीची शिक्षण व्यवस्था

0
सांगोला,संकेत टाइम्स : पुणे- मुंबई – लातूर – कोल्हापूर मोठ्या शहरात मिळणारे शिक्षण आता आपल्या सांगोल्यात उपलब्ध झाले आहे.ब्राईट फ्युचर ॲकॅडमीच्या माध्यमातून निष्णात विद्यार्थी घडतील,ते जागतिक स्पर्धेत  चमकतील.यामुळे आता सांगोल्यात शिक्षण क्रांती घडणार हे निश्चित असल्याचा, विश्वास इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेज (कोटा)राजस्थान येथील करिअर मार्गदर्शक प्रा.आदित्य व्यास यांनी व्यक्त केला.यशोजीवन एज्युकेशन प्रा. लि. सांगोला संचलित ब्राईट फ्युचर आयआयटी आणि मेडिकल ॲकॅडमीच्या वतीने रविवारी शहरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये इयत्ता 9 वी. ते 11 वी. च्या विद्यार्थी व पालकांसाठी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करिअर मार्गदर्शक म्हणून प्रा.आदित्य व्यास बोलत होते.यावेळी ॲकॅडमीचे चेअरमन डॉ. पियूषदादा पाटील, सचिव अनिल यलपले, कमलेश कुमार, भजन कंधारीया आदी उपस्थित होते.

 

प्रा.व्यास पुढे म्हणाले,संकटात संधी शोधणे किंवा चालून आलेल्या संधीचे वेळीच सोने करायला जमलं की एका नव्या गोष्टीचा जन्म होतो.शिक्षणाचे महत्व आधोरेखीत झाल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन आपले करिअर घडवू पाहत आहेत.अशा शिक्षणासाठी मोठ्या शहरात लाखो रुपयांची फी भरून आपले विद्यार्थी बाहेर पाठवण्यापेक्षा आता सांगोल्यात दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.
 प्रा.आदित्य व्यास म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून बाहेरगावी गेले आहेत.विद्यार्थी कुंटुबापासून लांब राहत असल्याने नात्यातील जवळीकता,प्रेम कमी होत आहे.परिणामी नात्यातील ओलावा टिकण्यासाठी आपल्याच भागात अशा शिक्षणाची सोय उपलब्ध करण्याचे काम ब्राईट फ्युचर आयआयटी आणि मेडिकल ॲकॅडमीच्या माध्यमातून सांगोल्यात सुरू झाले आहे.खेड्यापाड्यातील विद्यार्थी शिकला पाहिजे, त्यांच्या कलागुणांना उजाळा मिळाला पाहिजे ही भूमिका समोर ठेवून सांगोला, जत, पंढरपूर, आटपाडी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ब्राईट फ्युचर ॲकॅडमी ने  एमएचटी, सीईटी, नीट, जेइ मेन, जेइ ॲडव्हान्स, एनडीए, नाटा यासारख्या शिक्षणाच्या सुविधा सुरू केले आहेत. निश्चित येथील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होतील.असेही प्रा.आदित्य व्यास यांनी सांगितले.

 

चेअरमन डॉ.पियूषदादा साळुंखे पाटील म्हणाले, आपल्या तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये टिकला पाहिजे. आगामी परीक्षेसाठी सक्षमपणे सामोरे गेला पाहिजे.सांगोला तालुक्यात मोठ्या संख्येने अधिकारी – डॉक्टर- इंजिनीअर घडले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. येथील विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी संदर्भात शिक्षण देण्यासाठी नामवंत शिक्षक,शिक्षण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहेत.अत्याधुनिक युगात आणि शैक्षणिक स्पर्धेच्या जमान्यात ब्राईट फ्युचर ॲकॅडमीच्या वेगळेपण दिसून येईल,अशी खात्री डॉ.सांळुखे यांनी व्यक्त केली.

 

सचिव अनिल येलपले म्हणाले, इतर ॲकॅडमीच्या तुलनात्मक ब्राईट फ्युचर ॲकॅडमी कडून विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये फी आकारली जात आहे. इतर सेवा सुविधांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा केले असून ग्रामीण भागामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना सहज परवडेल या दृष्टीने या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थी व पालकांचा ब्राईट फ्युचर ॲकॅडमीस उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

डॉ.नेहाताई पियुषदादा साळुंखे पाटील म्हणाल्या, आपण जेव्हा मोठे होतो त्याबरोबर अजून दोन लोक मोठी होतात. ते म्हणजे आई वडील, अशा आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या करिअरची वाटचाल करावी. यामध्ये आपले करिअर निवडताना बाहेरगावी जाण्याची गरज नाही.
ॲड. गजानान भाकरे म्हणाले, सांगोल्यासाठी ॲकॅडमी मधील शैक्षणिक सुविधा हे सर्व काही नविन आहे. परंतू या सेमीनार आणि ॲकॅडमीच्या माध्यमातून निश्चीत मार्ग सापडेल. सेमिनार मध्ये सहभाग घेणारे आज रास्त मार्गावर आले आहेत. सर्वसमान्य नागरिकांचे आपल्या मुलांना डॉक्टर -अधिकारी बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ब्राईट फ्युचर ॲकॅडमी च्या सर्व पदाधिकारी यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.जेष्ठ पत्रकार वैजीनाथकाका घोंगडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हास्य सम्राट जितेश कोळी सर यांनी केले तर आभार डॉ. नेहाताई साळुंखे-पाटील यांनी मानले.यावेळी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.