ना.जयंत पाटील म्हणाले,
आगामी काळात मी पुन्हा जत तालुक्यात येईन, तेव्हा आपण पुन्हा एकदा आढावा घेऊ. विविध प्रश्नांचा ऊहापोह करण्याचे काम केले जाईल व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.
बुथ कमिट्यांवर भर द्या, बुथ कार्यकर्त्यांनी लोकांच्या मदतीला धावून जावं, हे केल्याने आपण लोकांच्या मनात घर करू. बुथ कमिट्या लवकर केल्या तर ते चांगले होईल. अनेकजण आपल्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छित आहेत. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ना.पाटील म्हणाले,
या भागात पाण्याची समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे. ६५ गावांसाठीच्या पाणी योजनेच्या कामाला गती देण्यात येईल, त्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल, असे जयंत पाटील यांनी आश्वासित केले. काही लोक फसवणूक केल्याचा आरोप आमच्यावर करत आहेत. फसवाफसवीची कामं आपल्याला जमत नाहीत. आम्ही जे बोलतो ते करतो, असा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला. तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि तुमचे प्रश्न सांगू शकता. मी मंत्री नंतर आणि पक्षाचा कार्यकर्ता आधी आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, प्रतिक पाटील, बसवराज पाटील, सुरेश शिंदे, जत तालुकाध्यक्ष रमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रकाश जमदाडे, सिद्धअण्णा शिरसाठ, चन्नाप्पा होर्तीकर, मन्सूर खतीब, शरद लाड, बाळासाहेब पाटील, अरूण असबे, राजू जानकर, बसवराज दोडमणी, दत्ताजीराव पाटील, उत्तम चव्हाण, प्रा. नारायण खर्जे, रेश्माका होर्तीकर, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, महिला जिल्हाध्यक्ष सुस्मीता जाधव, युवती जिल्हाध्यक्ष पूजा लाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष गीता कोडग, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पवन कोळी, डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष डॉ. पराग पवार, कमल पाटील, मिनाक्षी अक्की, अलका माने आदी उपस्थित होते.