जत, संकेत टाइम्स : जत (ता.जत)येथे मार्केट यार्ड मधिल जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या शेती इंडोरेक्टर व सचिव यांचे बैठकीत संचालक प्रकाशराव जमदाडे व मन्सूर खतीब यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जनरल मॅनेजर बी एस रामदुर्ग,तालुका अधिकारी आर टी कोळी, शेती इंडोरेक्टर व सचिव उपस्थित होते.
सर्व प्रकारची थकीत असणाऱ्या शेकऱ्यासाठी बँकेअच्या माध्यमातून ओ टी एस योजना 30 जूनपर्यंत आहे.त्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा काही अडचणी असतील तर वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदशन घ्यावे. बँकेचे परिपत्रक सर्व सरपंच चेअरमन याना पाठवले आहे.त्याचा पाठपुरावा करावा ज्या सोसायटीची वसुली होणार नाही.त्याचे सचिव,संबधीत इन्स्पेक्टर यांना जबाबदार धरले जाईल.मार्च अखेर तालुक्यातील सरासरी 39 टक्के वसुली आहे.ही जून अखेर 70 टक्के झाली पाहिजे,
यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.तसेच जे शेतकरी चांगले आहेत, त्यांना सर्व प्रकारचा कर्ज पुरवठा करणेत यावा. कोणाचीही अडचणी निर्माण करू नयेत,असे आवाहन संचालक प्रकाशराव जमदाडे व मन्सूर खतीब यांनी केले.यावेळी काही सचिवांनी शंका उपस्थित केल्या.त्या शंकाचे श्री. रामदुर्ग यांनी निरसन केले.वसुलीसाठी सर्व ती मदत करू,अशी ग्वाही सचिवानी दिली. संस्था निहाय आढावा घेतलेने काही सचिवांची चालचढल समोर आली.
सर्वांना कडक सुचना देण्यात आल्या आहेत. स्वागत आर टी कोळी यांनी केले व सचिव नाथा मोरे यांनी केले.