जतेत बसवेश्वर जयंतीनिमित्त २९ एप्रिल ते ३ मे पर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
जत,संकेत टाइम्स : जत मध्ये विविध उपक्रमांद्वारे बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येणार आहे.जयंतीनिमित्त दि.२९ एप्रिल ते ३ मे अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सलग ४ दिवस व्याख्यानमाला होणार आहे.व्याख्यानमाला दररोज संध्याकाळी ७ ते ९ शिवानुभव  मंडप जत येथे आहे.२९ एप्रिल शुक्रवार ला.डॉ. शिवरत्न शेटे यांचे “थोर क्रांतीकारक महात्मा बसवण्णा ” या विषयावर व्याख्यान आहे.
तर ३० एप्रिल ला, इंजिनिअर श्री किरण कोरे यांचे  ” महात्मा बसवण्णा व आपण ” या विषयावर व्याख्यान आहे.दि.१ मे ला , सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शिवानुभाव मंडप जत येथे महिला मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
त्यात रांगोळी स्पर्धा, पाक कला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा,नृत्य स्पर्धा होणार आहेत.
दि. १ मे ला संध्याकाळी प्राध्यापिका सौ. शालिनीताई दोडमनी यांचे “बाराव्या शतकातील क्रांतिकारी महिला “या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
दि.२ मे ला, सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ होणार असून अस्तुती, जिल्हा गदग कर्नाटक येथील पू.दिवान शरीफ मुल्ला स्वामीजी यांचे प्रवचन होणार आहे. व्याख्यानानंतर सर्वांसाठी दररोज प्रसादाची (दासोह) व्यवस्था केली आहे.
तरी सर्व जत वासीयांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज बहुउद्देशीय  सामाजिक संस्थेच्या सभासदांनी केली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.