महावितरणच्या जत मधिल या दोन कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी म्हणून गौरव
सांगली : महापूर, कोरोनासारख्या संकटांचा धीराने सामना करीत वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा देण्याचा वसा जपला आहे. ग्राहकांच्या हितासाठी यापुढील काळातही अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी प्रत्येक वीज कर्मचाऱ्यांने प्रयत्नशील रहावे. महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे कार्य राज्यात पथदर्शी ठरावे, अशी अपेक्षा मुख्य अभियंता मा. श्री. परेश भागवत यांनी व्यक्त केली. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळातील तंत्रज्ञ व यंत्रचालक संवर्गातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार मुख्य अभियंता मा. श्री. परेश भागवत यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त परिमंडळाच्या प्रांगणात मुख्य अभियंता यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी अधिक्षक अभियंता मा.श्री.अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता श्री.प्रशांतकुमार मासाळ, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे, जनसंपर्क अधिकारी श्री. किशोर खोबरे यांची उपस्थिती होती. यावेळी अधिक्षक अभियंता श्री.कावळे यांनी शुन्य वीज अपघातासाठी वीज कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेला प्राधान्य द्यावे,अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कोल्हापूर मंडळाच्या प्रशिक्षण केंद्राने राज्यात अव्वल कामगिरी केल्याबद्दल लघुप्रशिक्षण केंद्राचे समन्वयक उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.
सांगली मंडळ पुरस्कारप्राप्त वीज कर्मचारी

वीजसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तंत्रज्ञ व यंत्रचालक संवर्गातील वीज कर्मचाऱ्यांचा कौतूक सोहळा महावितरणमध्ये पार पडला. पुरस्कार स्वरूपात सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तंत्रज्ञ संवर्गात प्रधान तंत्रज्ञ चंद्रकांत पाटील (शाखा कार्यालय बुधगाव), सुनिल कदम (येळावी), अमर घोरपडे (आंबेडकर रोड), रंगराव कुंभार (इस्लामपूर 1), प्रशांत शिंदे (खानापूर), महालिंग माळी (जत पश्चिम), वरीष्ठ तंत्रज्ञ संदिप सुर्यवंशी (भोसे), मोहन यादव (सावर्डे), अश्विनी वडिंगे (रिसाला रोड), किसन गेजगे (विश्रामबाग), प्रकाश मोरे (कुपवाड), विनायक सावर्डे (खनभाग), गंगाराम ओमासे (मिरज शहर), शिशिर धनवडे (कुरळप), गणेश गायकवाड (बावची), महेंद्र चौधरी (आरळा), प्रमोद कदम (विटा शहर), मारुती जाधव (नेवरी), शिवाजी निळे (शिरढोण), उमाजी वाघमारे (दरिकोन्नुर), खंडु पवार (सलगरे), तंत्रज्ञ शाहीद शिकलगार (बोरगांव), बिरुदेव माडकर (आटपाडी), इम्रान मुल्ला (कुंडल), या 24 कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंत्रचालक संवर्गात प्रधान यंत्रचालक बाबासाहेब पाटील (33/11 केव्ही उपकेंद्र शिराळा), वरिष्ठ यंत्रचालक अशोक तांदळवाडे (अरग), यंत्रचालक दिपक आष्टेकर (सावळी), प्रमोद पोतदार (रिसाला रोड), महेश चव्हाण (आटपाडी) या कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.