पुर्वमधिल ९ सोसायटीच्या १,०५५ सभासदांना ७ कोटीची कर्जमाफी मिळणार ; प्रकाश जमदाडे यांची माहिती | बँकेच्या ओटीएस योजनेत सहभागाचे आवाहन

0
4
जत,संकेत टाइम्स : बँक आपले दारी अभियान अंतर्गत जिल्हा बँक संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी शनिवारी करजगी, बोर्गी व बेंळोडगी सोसायटीची आढावा बैठक जिल्हा बँकेच्या बेंळोडगी शाखेत तर हळ्ळी,बालगाव,सुसलाद, सोनलगी व उमदी सोसायटी आढावा बैठक समता सोसायटी उमदी येथे घेतली.यावेळी तालुका अधिकारी नाटेकर ,शेती अधिकारी आर एम कोळी,शाखाधिकारी पारसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड होर्तिकर,हलकुंडे, सोसायटी चेअरमन, व्हा चेअरमन, सचिव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बँकेतून कर्ज वाटप,ठेवी व ओटीएस योजना याबाबत सविस्तर चर्चा झाली.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेऊन थकबाकीतून मुक्त व्हावे.बँकेला व सोसायटीला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी जमदाडे यांनी केले.
या भागातील 9 सोसायटी मधील सर्व थकबाकीदार सभासदांनी भाग घेतल्यास जवळपास 1,055 सभासदांना 7 कोटी रुपयाची व्याजमाफी मिळणार आहे. बँकेच्या कर्जाच्या सर्व योजना सभासदांना समजवण्यात आल्या, बँकेमध्ये मी, मन्सूर खतीब बँकेची धोरणे व सर्व प्रकारच्या योजना या शेतकरी ,व्यापारी ,छोटे उदोजाक, नोकरदार व वंचित शोषित घटकासाठी व तालुक्यातील सर्वसामान्यासाठी विशेष योजना राबिवणार आहोत,अशी ग्वाही दिली यावेळी जमदाडे यांनी दिली.यावेळी जमदाडे यांचा सत्कार करण्यात आला.
बेंळोडगी ता.जत येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना संचालक प्रकाशराव जमदाडे
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here