श्री संत बागडेबाबा मंदिराच्या लोकार्पण सोहळयानिमित्य १६ ते २१ मे दरम्यान विविध कार्यक्रम | हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

0
35

★ २० मे ला भव्य दिंडी मिरवणूक ; २१ मे ला मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन

जत, संकेत टाइम्स : राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य वैराग्यसंपन्न श्री संत सयाजी बागडेबाबा यांचे संख ( गोंधळेवाडी ) येथील बाबा आश्रमात भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्य १६ मे ते २१ मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मूळचे जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील रहिवासी असलेले श्री संत बागडेबाबा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी खर्ची केले. भजन व कीर्तनाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम बागडेबाबा यांनी केले. बागडेबाबा यांनी मंगळवेढा तालुक्यातील चिखलगी भुयार येथे अनेक वर्षे वास्तव करत भक्तांना अंधश्रद्धेपासून दूर रहा असा संदेश दिला. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत श्री संत बागडेबाबा यांचा वैचारिक वारसा जपण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, कोरोना, जळीत घटना , अपघात आदी दुर्घटनेवेळी मदत नव्हे कर्तव्य म्हणून सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला.

संख ( गोंधळेवाडी ) येथे श्री संत बागडेबाबा यांचे मंदिर असावे हे आपले स्वप्न होते. श्री संत बागडेबाबा यांच्या स्वप्नातील मंदिराचे काम मागील दहा वर्षांपासून सुरू होते. आज ते काम आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा १६ ते २१ मे दरम्यान आयोजित करण्यात आला असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१६ मे रोजी सकाळी सहा वाजता वीणा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. रात्री आठ वाजता हभप वसंतराव महाराज काटे, हभप जायाप्पा महाराज, हभप अमृत पाटील महाराज, हभप युवराज शिंदे महाराज, हभप पुंडलिक साठे महाराज, हभप जंगली महाराज यांचे कीर्तन व त्यानंतर आसंगी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.

१७ मे रोजी रात्री नऊ वाजता हभप बिरा महाराज बंडगर, हभप शिवराया हतळळी महाराज, हभप रामकृष्ण बागडे महाराज, हभप हिप्परकर महाराज, हभप नामदेव खैरावकर महाराज, हभप श्रीशैल कुंभार महाराज यांचे कीर्तन त्यानंतर आसंगी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.

१८ मे रोजी रात्री नऊ वाजता हभप सुप्रियाताई बंडगर महाराज, हभप हसन अत्तार महाराज, हभप सखुबाई नरळे महाराज, हभप सुधीर महाराज, हभप सुवर्णा राठोळ महाराज यांचे कीर्तन त्यानंतर तपोवन रेवनसिद्ध चिखलगी मठ यांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.

 

१९ मे रोजी रात्री नऊ वाजता हभप गोरख महाराज रायते, हभप शाहीर हेगडे महाराज,
हभप शिवसेक्रेटरी महाराज, प.पु. अमृतानंद महास्वामीजी, हभप बाळू खडतरे महाराज यांचे कीर्तन त्यानंतर सोरडी व्हसपेठ गुरुजी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.

२० मे रोजी रात्री नऊ वाजता हभप नवनीत महाराज करगणीकर महाराज, हभप एकनाथ महाराज, हभप कुलकर्णी महाराज, हभप कननुर महाराज, हभप सरिता विनोबा लिंगायत महाराज, हभप बाबासाहेब पात्रे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

■ २० मे ला मूर्तीची मिरवणूक
२० मे रोजी सायंकाळी चार वाजता श्री संत बागडेबाबा यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक श्री लायव्वादेवी मंदिर ते बाबा आश्रम दरम्यान निघणार आहे.

■ २१ मे ला लोकार्पण सोहळा
२१ मे रोजी सकाळी अकरा वाजता श्री संत बागडेबाबा यांच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यास जतकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here